बॉलिवूडची ‘माँ’ रिमा लागू यांच्या काही गाजलेल्या भूमिका...
By ऑनलाइन लोकमत | Published: May 18, 2017 04:39 AM2017-05-18T04:39:35+5:302017-05-18T10:25:04+5:30
रिमा लागू आज आपल्यात नाही. पण या भूमिकांच्या रूपात प्रेक्षकांच्या मनात त्या कायम जिवंत असतील.
म ाठी आणि हिंदी चित्रपटसृष्टी, रंगभूमी, छोटा पडदा अशा सगळ्याठिकाणी लिलया वावरणाºया ज्येष्ठ अभिनेत्री रिमा लागू यांचे गुरुवारी पहाटे निधन झाले. हिंदी आणि मराठीतील अनेक गाजलेल्या चित्रपटांत त्यांनी भूमिका केल्या. यापैकी बहुतांश चित्रपटात त्यांनी आईची भूमिका साकारली. रिमा लागू आज आपल्यात नाही. पण या भूमिकांच्या रूपात प्रेक्षकांच्या मनात त्या कायम जिवंत असतील.
मैंने प्यार किया
१९९० मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘मैने प्यार किया’ या चित्रपटासाठी त्यांना सर्वोत्कृष्ट सहायक अभिनेत्रीचा फिल्मफेअर पुरस्कारही मिळाला होता.
हम आपके है कौन
त्याचबरोबर ‘हम आपके है कौन’मधील व्यक्तिरेखेसाठीही त्यांना १९९५ मध्ये फिल्मफेअर पुरस्काराने गौरविण्यात आले होते. या चित्रपटातील ‘आज हमारे दिल में अजब सी...’ या गाण्यातील रिमा लागू यांचा अभिनय लोकांना चांगलाच भावला होता.
हम साथ साथ है
रिमा लागू सूरज बडजात्या यांच्यासाठी लोकप्रीय ‘आई’ होत्या. कदाचित त्याचमुळे ‘मैंने प्यार किया’नंतर बडजात्या यांच्या जवळपास सर्वच चित्रपटात रिमा लागू याच आईच्या भूमिकेत दिसल्या. ‘हम साथ साथ है’ या चित्रपटात त्यांनी सैफ अली खान, सलमान खान व मोहनीश बहल यांच्या आईची भूमिका साकारली होती.
वास्तव
संजय दत्तची प्रमुख भूमिका असलेल्या ‘वास्तव’ चित्रपटातील त्यांची व्यक्तिरेखाही खूप गाजली होती.
साजन
‘मैंने प्यार किया’, ‘साजन’, ‘हम साथ साथ हैं’,‘जुडवा’ आणि ‘पत्थर के फूल’ या सिनेमात त्यांनी सलमान खानच्या आईची भूमिका केली.
१९९० साली ‘मैंने प्यार किया’, १९९१ साली ‘आशिकी’, १९९५ साली ‘हम आपके हैं कौन’ आणि २००० साली ‘वास्तव’ या सिनेमांसाठी त्यांना चारवेळा फिल्मफेअरचा सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला.
जुडवा
‘जुडवा’ या चित्रपटात रिमा लागू सलमानच्या आईच्या रूपात दिसल्या होत्या. हा चित्रपट बॉक्सआॅफिसवर हिट झाला होता. लवकरच या चित्रपटाचा रिमेकही येतोय.
कुछ कुछ होता है
करण जोहरच्या या चित्रपटात रिमा लागू यांनी काजोलच्या आईची भूमिका साकारली होती.