बॉलिवूडच्या ‘या’ चित्रपटांनी प्रेक्षकांची केली निराशा!

By ऑनलाइन लोकमत | Published: September 12, 2017 01:42 PM2017-09-12T13:42:37+5:302017-09-12T19:12:37+5:30

अबोली कुलकर्णी २०१७ हे वर्ष बॉलिवूडच्या चित्रपटांसाठी फार काही प्रभावी ठरले नाही. बऱ्याच चित्रपटांनी त्यांचे नाव प्रेक्षकांच्या मनात कोरले; ...

Bollywood's 'these' films have disappointed the audience! | बॉलिवूडच्या ‘या’ चित्रपटांनी प्रेक्षकांची केली निराशा!

बॉलिवूडच्या ‘या’ चित्रपटांनी प्रेक्षकांची केली निराशा!

googlenewsNext
ong>अबोली कुलकर्णी

२०१७ हे वर्ष बॉलिवूडच्या चित्रपटांसाठी फार काही प्रभावी ठरले नाही. बऱ्याच चित्रपटांनी त्यांचे नाव प्रेक्षकांच्या मनात कोरले; मात्र काही चित्रपट अयशस्वी ठरले. आता हेच पाहा ना, सलमान खानच्या ‘बजरंगी भाईजान’वर प्रेक्षकांनी तुफान प्रेम केलं. मात्र, त्याच धर्तीवर साकारलेला ‘ट्यूबलाईट’ हा चित्रपट बॉक्स आॅफिसवर दणकून आपटला. बॉलिवूडचा किंग शाहरूख खान याचे केवळ नाव जरी असले तरीही लोक चित्रपटगृहात गर्दी करतात. पण, ‘जब हॅरी मेट सेजल’ च्याबाबतीत तसे घडले नाही. बॉक्स आॅफिसवर या चित्रपटानेही फार काही कमाई केली नाही. पाहूयात, असेच काही चित्रपट ज्यांनी प्रेक्षकांची निराशा केली...



ओके जानू 
आदित्य रॉय कपूर आणि श्रद्धा कपूर यांचा चित्रपट ‘ओके जानू’ हा मणिरत्नम यांच्या तमिळ चित्रपट ‘ओ कन्मनी कन्मनी’ याचा रिमेक होता. तमिळ चित्रपटाने समीक्षकांकडून चांगले व्ह्यूज मिळवले. पण, ‘ओके जानू’ हा चित्रपट पडद्यावर तेवढा प्रभावी ठरू शकला नाही. मणिरत्नम यांच्या चित्रपटातील गाणी, कथानक यांना तमिळ प्रेक्षकांनी डोक्यावर घेतले होते. पण, ओके जानूच्या कथानक, संगीताला फारसा प्रतिसाद मिळाला नाही.

रंगून
सैफ अली खान, शाहिद कपूर आणि कंगना राणौत यांच्या मुख्य भूमिकेतील ‘रंगून’ हा चित्रपट २०१७ या वर्षातील सर्वांत मोस्ट अवेटेड चित्रपट होता. संगीत, कथानक आणि विशाल भारद्वाज यांचे दिग्दर्शन यांच्यामुळे चित्रपटाकडे पाहण्याची वेगळी दृष्टी प्रेक्षकांना मिळाली. मात्र, बॉक्स आॅफिसवर रसिकांनी तितकासा प्रभाव दाखवला नाही.



आ गया हिरो
बॉलिवूडचा चीची, एकेकाळचा ‘हिरो नं. १’ गोविंदा याचा कमबॅक चित्रपट म्हणून आपण ‘आ गया हिरो’ कडे पाहतो. गोविंदाचा चित्रपट म्हटल्यावर ‘फुल्ल टू अ‍ॅक्शन’, रोमान्स, थ्रिल हे तर असणारच पण.केवळ गोविंदा आहे म्हणून चित्रपटगृहात जाऊन चित्रपट एन्जॉय करणारे प्रेक्षक तसे कमीच होते. गोविंदाचा अप्रतिम डान्स मुव्ह्ज हे वगळता दुसरे चित्रपटात काहीही पाहण्यासारखे नव्हते.



मशीन
अब्बास बर्मावाला यांचा मुलगा मुस्तफा याने ‘मशीन’ या चित्रपटातून डेब्यू केला आहे. ९० च्या दशकात अब्बास-मस्तान यांनी उत्तम चित्रपट साकारले. त्यांनी यामुळेच मुस्तफाच्या यशासाठीही त्यांनी असाच पर्याय निवडला. मात्र, मुस्तफासोबत कियारा अडवाणी असल्यामुळे फारसा प्रभाव पडला नाही. त्यांची केमिस्ट्री प्रेक्षकांना जास्त आवडली नाही. 



फिल्लौरी
‘एनएच १०’ या चित्रपटाची निर्मिती अभिनेत्री अनुष्का शर्मा हिने तिच्या प्रोडक्शन हाऊसमधून केली होती. या चित्रपटाला रसिकांचा चांगला प्रतिसाद मिळाल्याने तिने ‘फिल्लौरी’च्या माध्यमातून एका नव्या आणि आकर्षक थीमवर चित्रपट काढण्याचा विचार केला. ‘फिल्लोरी’ हा चित्रपट एका सुंदर भूतावर आधारित असून सामाजिक संदेश देणारा हा चित्रपट होता. पण, हा चित्रपट फारसा प्रभावी ठरला नाही. 

Web Title: Bollywood's 'these' films have disappointed the audience!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.