बॉलिवूडचा तीस मार खॉँ अक्षयकुमार ‘या’ कारणासाठी पत्नीला घाबरतो!
By ऑनलाइन लोकमत | Published: May 28, 2017 04:26 PM2017-05-28T16:26:59+5:302017-05-28T21:56:59+5:30
बॉलिवूडचा सर्वात फिट अन् तीस मार खॉँ अभिनेता म्हणून अक्षयकुमारला ओळखले जाते. मात्र हाच तीस मार खॉँ पत्नी ट्विंकलला ...
ब लिवूडचा सर्वात फिट अन् तीस मार खॉँ अभिनेता म्हणून अक्षयकुमारला ओळखले जाते. मात्र हाच तीस मार खॉँ पत्नी ट्विंकलला मात्र एका गोष्टीसाठी खूपच घाबरत असल्याची बाब समोर आली आहे. वास्तविक अक्षय पत्नीला घाबरतो या गोष्टीवर त्याच्या चाहत्यांचा विश्वास बसणार नाही, मात्र हे खरे आहे. वास्तविक अक्षयला क्रिकेटचे प्रचंड वेड आहे. जेव्हा-केव्हा त्याला शक्य होईल तेव्हा तो मैदान गाठतो. बºयाचदा तर तो शूटिंगचे शेड्यूल्ड सोडून आपला छंद जोपासतो. जेव्हा रात्रीचा क्रिकेटचा सामना असतो तेव्हा रात्री उशिरापर्यंत जागरण करून तो सामना बघत असतो. ही बाब ट्विंकलला फारशी आवडत नाही, त्यामुळे तो तिच्या चोरून मॅच बघत असल्याचा खुलासा अक्षयने केला आहे.
अक्षय वेळेचा खूपच पक्का आहे. तो दररोज रात्री ९ वाजता झोपतो अन् पहाटे ४ वाजता उठतो. हा त्याचा नित्याचाच दिनक्रम आहे. मात्र क्रिकेटसाठी तो या दिनक्रमात बदल करण्यास तयार असतो. चॅम्पियंस ट्रॉफीच्या रविवारी खेळविल्या गेलेल्या भारत आणि इग्लंडमधील सराव सामन्यादरम्यान अक्षय त्याच्या आगामी ‘टॉयलेट एक प्रेम कथा’ या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी स्टार स्पोटर््स चॅनेलच्या सेटवर पोहोचला होता. जेव्हा त्याला क्रिकेटच्या प्रेमाविषयी विचारले तेव्हा त्याने याबाबतचा खुलासा केला.
अक्षयने म्हटले की, मला आणि ट्विंकलला वेळेचे बंधन आहे. त्यामुळे आम्ही दररोज रात्री ९ वाजताच झोपत असतो. मात्र जेव्हा क्रिकेटचा सामना असतो तेव्हा मी रात्री उशिरापर्यंत मॅच बघत असतो. कधी-कधी रात्रीच्या ११, १२ वाजेपर्यंत सामना रंगत असतो, अशात मी ट्विंकलच्या चोरून आयपॅडवर मॅच बघतो. यावेळी अक्षयला काही प्रश्नही विचारण्यात आले. जेव्हा त्याला त्याच्या फेव्हरेट क्रिकेटरविषयी विचारण्यात आले तेव्हा त्याने म्हटले की, ‘सर्वच खेळाडू चांगले प्रदर्शन करीत आहेत. त्यामुळे कोण्यातरी एका खेळाडूचे नाव घेणे अवघड आहे. वास्तविक मला विराट कोहली, युवराज सिंग, अजिंक्य रहाणे या खेळाडूंचा खेळ आवडतो, असेही तो म्हणाला.
अक्षय त्याच्या आगामी ‘टॉयलेट : एक प्रेमकथा’ या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये सध्या व्यस्त आहे. हा चित्रपट ११ आॅगस्ट २०१७ रोजी रिलीज होणार आहे. चित्रपटात त्याच्यासोबत अभिनेत्री भूमी पेडनेकर हिची मुख्य भूमिका आहे. हा चित्रपट एक बायोपिक आहे.