Preity Zinta Mohammad Amir: पाकिस्तानच्या मोहम्मद आमिरचा प्रिती झिंटासोबतचा फोटो व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Published: September 8, 2022 04:44 PM2022-09-08T16:44:29+5:302022-09-08T16:45:31+5:30
प्रिती झिंटा अन् मोहम्मद आमिर वेस्ट इंडिजमध्ये एकत्र दिसले
Preity Zinta Mohammad Amir: Asia Cup 2022 मध्ये भारत, पाकिस्तान आणि अफगाणिस्तान यांच्यात चुरशीची लढत झाली. तर दुसरीकडे वेस्ट इंडिजमध्ये एक वेगळेच प्रकरण समोर आले. येथे कॅरेबियन प्रीमियर लीग (CPL) खेळत असलेला पाकिस्तानी खेळाडू मोहम्मद आमिर याने स्वतःला बॉलिवूड अभिनेत्री प्रीती झिंटाचा जबरा फॅन असल्याचे सांगितले. बॉलिवूड अभिनेत्री प्रीती झिंटाची कॅरेबियन प्रीमियर लीगमध्येही टीम आहे. त्याचे नाव सेंट लुसिया किंग्स आहे. संघाचा सामना पाहण्यासाठी प्रीती वेस्ट इंडिजला पोहोचली होती. पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज मोहम्मद आमीरही या लीगमध्ये खेळत आहे. त्याने प्रीतीसोबत एक फोटो काढला आणि तो सोशल मीडियावर शेअर केला आणि स्वत:ला प्रितीचा 'जबरा फॅन' असल्याचे सांगितले.
मोहम्मद आमिरने प्रिती झिंटाचा फॅन असल्याची तर कबुली दिलीच, पण त्याशिवाय, आमिरने प्रीतीसोबत एक सेल्फीही काढला आणि तो सोशल मीडियावर शेअर केला. फोटो शेअर करताना या पाकिस्तानी खेळाडूने स्वत:ला प्रीती झिंटाचा जबरा फॅन असल्याचे सांगितले. तसेच बॉलीवूडमधली ती त्याची सर्वात आवडती अभिनेत्री असल्याचेही तो म्हणाला. मोहम्मद आमिर सध्या कॅरेबियन प्रीमियर लीगमध्ये जमैका तलायव्हाज संघाकडून खेळत आहे. या लीगमध्ये प्रीती झिंटाची 'सेंट लुसिया किंग्स' नावाची टीम आहे. बुधवारी (७ सप्टेंबर) जमैका आणि किंग्ज यांच्यात सामना झाला. हा सामना पाहण्यासाठी प्रीती झिंटाही स्टेडियममध्ये पोहोचली होती. या दरम्यान आमिरने प्रितीसोबत सेल्फी काढला आणि फोटो पोस्ट केला.
my all time favourite from bollywood @realpreityzintapic.twitter.com/vwLG0Ga4gE
— Mohammad Amir (@iamamirofficial) September 8, 2022
या सामन्यात आमिरने २५ धावांत तीन बळी घेतले, मात्र तो संघाला विजय मिळवून देऊ शकला नाही. सेंट लुसिया किंग्ज संघाने हा सामना २ गडी राखून जिंकला. सामन्यानंतर आमिरने फोटो शेअर केला. आमिरच्या या पोस्टवर चाहत्यांनी त्याला जोरदार ट्रोल करण्यास सुरुवात केली. एका यूजरने लिहिले की, 'तो प्रितीची IPL टीम पंजाब किंग्ससोबत खेळेल का?' त्याचवेळी दुसऱ्या युजरने लिहिले की, 'भाई (कितीही स्तुती केलीस तरी) IPL मध्ये घेणार नाहीत.'