कास्टिंग काउचवर बोलली रविना टंडन; म्हटले, ‘मला तर अभिनेतेही घाबरायचे’!
By ऑनलाइन लोकमत | Published: February 24, 2018 08:57 AM2018-02-24T08:57:56+5:302018-02-24T14:27:56+5:30
ग्लॅमर इंडस्ट्रीमध्ये कास्टिंग काउचवरून सध्या जोरदार चर्चा रंगताना दिसत आहे. कारण बरेसचे कलाकार या विषयावर अतिशय बिनधास्तपणे बोलताना दिसत ...
ग लॅमर इंडस्ट्रीमध्ये कास्टिंग काउचवरून सध्या जोरदार चर्चा रंगताना दिसत आहे. कारण बरेसचे कलाकार या विषयावर अतिशय बिनधास्तपणे बोलताना दिसत आहेत. नुकतेच बॉलिवूड अभिनेत्री रविना टंडन हिने कास्टिंक काउचबद्दल एक मोठे अन् खळबळजनक वक्तव्य केले आहे. त्यामुळे सध्या रविना इंडस्ट्रीमध्ये चर्चिली जात आहे. रविनाने एक टीव्ही शो दरम्यान म्हटले की, ‘अशा प्रकाराला तेच लोक बळी पडतात जे तडजोड करण्यास तयार होतात.’ यावेळी रविनाने या प्रकरणातील दोन्ही बाजूच्या लोकांना जबाबदार ठरविले आहे.
रविनाने म्हटले की, कास्टिंग काउच कोणावर जबरदस्ती करून होत नाही. हे दोन्ही लोकांच्या सहमतीने होत असते. जे लोक कामासाठी डेसप्रेट होत असतात, त्यांच्यासोबत असे प्रकार घडतात. रविनाने नुकतेच एका टॉक शोमध्ये कास्टिंग काउचबद्दल अतिशय बेडधक वक्तव्य केले. रविना गेल्या बºयाच काळापासून बॉलिवूडमध्ये सक्रिय आहे. शो च्या हासेटने जेव्हा रविनाला कास्टिंग काउचविषयी तिचे मत विचारले होते. तिने म्हटले की, ‘खरं सांगायचे झाल्यास माझ्यासोबत हे कधी घडले नाही. आपल्याला कास्टिंग काउच, एका सहकाºयासोबतची रिलेशनशिप आणि लैंगिक शोषण याच्यातील फरक आपल्याला समजून घ्यायला हवा. कास्टिंग काउच तेव्हा होते जेव्हा तुम्ही एखाद्याच्या दबावात असता. त्यामुळे जोपर्यंत तुम्ही दुसºयास खुश करीत नाही, तोपर्यंत तो तुम्हाला खुश करीत नाही. माझ्यासोबत असे कधीच घडले नाही. माझ्या चित्रपटातील अभिनेतेदेखील मला घाबरायचे. त्यामुळे सुदैवाने मला याचा सामना करावा लागला नाही.
रविनाने पुढे बोलताना म्हटले की, असे प्रकार त्याच व्यक्तीबरोबर घडतात जो कामाबद्दल खूपच दबावात असतो. पुढे त्याचा असा समज होतो की, अशाप्रकारेच यश मिळत जाते. मी या प्रकरणात दोघांनाही जबाबदार धरते. बºयाचदा असे म्हटले जाते की, लहान शहरातील किंवा बाहेरून आलेले लोकच यास अधिक बळी पडतात. परंतु यात फारशी सत्यता नाही. या प्रकाराचा कोणालाही सामना करावा लागू शकतो. त्यामुळे हे सर्वस्वी तुमच्यावर अवलंबून असते की, तुम्हाला काय अपेक्षित आहे.