ज्या हॉटेलमध्ये रूम सर्व्हिसचं काम करायचे, आता तेथूनच बोमन इराणी यांनी शेअर केला व्हिडीओ

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 27, 2025 16:50 IST2025-03-27T16:50:23+5:302025-03-27T16:50:39+5:30

बोमन इराणी यांचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Boman Irani Shares His Inspiring Taj Palace Story Room Service At Taj Colaba To Acting | ज्या हॉटेलमध्ये रूम सर्व्हिसचं काम करायचे, आता तेथूनच बोमन इराणी यांनी शेअर केला व्हिडीओ

ज्या हॉटेलमध्ये रूम सर्व्हिसचं काम करायचे, आता तेथूनच बोमन इराणी यांनी शेअर केला व्हिडीओ

Boman Irani Taj Hotel Video: बॉलिवूड अभिनेते बोमन इराणी (Boman Irani) यांना आज कुठल्याही परिचयाची गरज नाही. 'मुन्नाभाई एमबीबीएस'मधील डॉ. अस्थाना आणि 'थ्री इडियट्स'मध्ये व्हायरससारख्या संस्मरणीय भूमिका साकारणाऱ्या बोमन इराणी यांचा जगभरात मोठा चाहतावर्ग आहे.  सिनेसृष्टित त्यांनी स्वतःचा ब्रँड तयार केलाय. पण, हा प्रवास सोपा नव्हता.  यासाठी बोमन यांनी अत्यंत जीव तोडून मेहनत घेतली आहे. मुताज महाल पॅलेस या मुंबईच्या आलीशान हॉटेलमध्ये वेटर तसेच रूम सर्व्हिस म्हणूनही काम केलं होतं. आज त्याच हॉटेलमधून बोमन इराणी यांनी व्हिडीओ शेअर केलाय. 

अलीकडेच बोमन इराणी मुंबईतील ताज हॉटेलमध्ये झालेल्या एका कार्यक्रमात सहभागी झाले होते. यावेळी त्यांनी कॉरिडॉरमध्ये एक व्हिडीओ बनवला आणि तो इन्स्टाग्रामवर पोस्ट केलाय.  हा व्हिडीओ शेअर करत कॅप्शनमध्ये त्यांनी लिहलं, "जीवन एक पूर्ण वर्तुळ आहे". व्हिडीओमध्ये ते म्हणतात, "नमस्कार सर्वांना... मी सध्या कोलाबामधील तॉज हॉटेलमध्ये आहे. किती सुंदर हे हॉटेल आहे. मी या ठिकाणी १९७९ ला रूम सर्व्हिस म्हणूनही काम केलं होतं. याच कॉरीडॉरमध्ये माझं जास्त काम असायचं. चहा, कॉफी, नाष्टा हे पोहचवण्याचं काम मी करायचो.  याच ठिकाणी बऱ्याच गोष्टी शिकलो. आयुष्यात काहीच सहज मिळत नाही. यासाठी तुम्हाला किंमत चुकवावी लागते. कष्ट करावे लागतात. आज कामानिमित्त मी येथे आलो. खुप छान वाटतंय. मला खरंच आभिमान वाटतोय. आज आयुष्यातील एक वर्तुळ पुर्ण झालं आणि मी खूप भारावून गेलोय". या व्हिडीओमध्ये बोमन इराणी हे भावूक झाल्याचं दिसतंय. 


आयुष्य हे एक चक्र असतं आणि मेहनतीच्या बळावर माणूस हवं ते साध्या करु शकतो, हे सिद्ध करणारा बोमन इराणी यांचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. अनेकांनी कमेंट करत बोमन इराणी यांचं कौतुक केलं आहे. या व्हिडिओला आतापर्यंत ४ लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत.  बोमन इराणी यांच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर अलिकडेच त्यांचा 'मेहता बॉईज' हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. मुलगा आणि वडील यांच्यातील नातं खूप सुंदरपणे मांडण्याचा प्रयत्न या चित्रपटातून करण्यात आला आहे. 

Web Title: Boman Irani Shares His Inspiring Taj Palace Story Room Service At Taj Colaba To Acting

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.