"आम्हाला मुलांची काळजी...", ३ एप्रिलला बंद खोलीत होणार सुनावणी; नवाजुद्दीन अन् पत्नीला कोर्टानं बोलावलं!

By ऑनलाइन लोकमत | Published: March 30, 2023 03:46 PM2023-03-30T15:46:13+5:302023-03-30T15:48:29+5:30

बॉलीवूड अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी आणि त्याची पत्नी आलिया सिद्दीकी यांच्यासह भाऊ शमशुद्दीन सिद्दीकी यांना ३ एप्रिल रोजी मुंबई हायकोर्टात हजर रहावं लागणार आहे.

bombay high court ask nawazuddin siddiqui his wife and children to appear on april 3 | "आम्हाला मुलांची काळजी...", ३ एप्रिलला बंद खोलीत होणार सुनावणी; नवाजुद्दीन अन् पत्नीला कोर्टानं बोलावलं!

"आम्हाला मुलांची काळजी...", ३ एप्रिलला बंद खोलीत होणार सुनावणी; नवाजुद्दीन अन् पत्नीला कोर्टानं बोलावलं!

googlenewsNext

बॉलीवूड अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी आणि त्याची पत्नी आलिया सिद्दीकी यांच्यासह भाऊ शमशुद्दीन सिद्दीकी यांना ३ एप्रिल रोजी मुंबई हायकोर्टात हजर रहावं लागणार आहे. त्याच दिवशी आलिया सिद्दीकी हिला आपली १२ वर्षांची मुलगी आणि ७ वर्षांच्या मुलाला देखील सोबत आणावं लागणार आहे. तसे आदेश हायकोर्टानं दिला आहे. दोन्ही पक्षकारांना बोलावून समजूत काढण्याचा प्रयत्न कोर्ट करणार आहे. 

नवाजुद्दीन सिद्दीकी याचा पत्नी आलिया आणि तिचा भाऊ शमशुद्दीन याच्यासोबत वाद सुरू आहेत. नवाजुद्दीननं दोघांवरही १०० कोटी रुपयांचा मानहानीचा खटला दाखल केला आहे. पण नवाजुद्दीन यानं आपल्या मुलांसाठी समजूतीन मार्ग निघत असेल तर त्यासाठीही तयारी दाखवली आहे. 

नवाजुद्दीनच्या अपीलवर मुलांनाही बोलावण्यात आलं
नवाजुद्दीन सिद्दीकीनं मुंबई उच्च न्यायालयात हेबियस कॉर्पस याचिका दाखल केली होती आणि कोर्टाला विनंती केली होती की त्यांनी आपल्या पत्नीला त्यांच्या दोन मुलांची माहिती देण्याचे निर्देश द्यावे. यासोबतच आरोपींना न्यायालयात बोलावण्याची मागणीही करण्यात आली. त्यावर आता न्यायालयाने आदेश दिला आहे.

बंद खोली होणार सुनावणी
नवाजुद्दीन सिद्दीकीच्या याचिकेवर न्यायालयाने आज आदेश दिले की ३ एप्रिल रोजी न्यायाधीश या प्रकरणाची कॅमेरासमोर सुनावणी करतील. त्यासाठी सर्व पक्षांनी उपस्थित रहावे. न्यायालयाचं म्हणणे आहे की, त्यांना मुलांची काळजी आहे आणि त्यांची इच्छा आहे की शांततापूर्ण तोडगा काढला जावा.
  
मानहानीचा खटला मागे घेण्याची तयारी
नवाजुद्दीन सिद्दीकी पत्नी आलियासोबत तडजोड करण्यास तयार आहे. मात्र, त्याच्या अटींमध्ये मानहानीचा खटला मागे घ्यावा, अशी मागणी आलियाकडे करण्यात आली आहे. रिपोर्ट्सनुसार, आलियाने त्याच्या अटी मान्य केल्या आहेत. मात्र, तो पत्नीला घटस्फोट देऊन मुलांच्या ताब्यासाठी न्यायालयामार्फत लढा देणार आहे. दरम्यान, आता न्यायालयाने पुन्हा एकदा दोन्ही पक्षांना करारासाठी बोलावले आहे.

Web Title: bombay high court ask nawazuddin siddiqui his wife and children to appear on april 3

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.