'त्यांच्या रिलेशनला मंजुरी दिली नाही..'; जान्हवी, अर्जुनच्या अफेअरला बोनी कपूर यांचा विरोध?

By ऑनलाइन लोकमत | Published: April 2, 2024 11:52 AM2024-04-02T11:52:43+5:302024-04-02T11:53:04+5:30

Boney kapoor: बोनी कपूर यांनी दिलेल्या मुलाखतीमध्ये पहिल्यांदाच त्यांच्या मुलांच्या अफेअरवर स्पष्टपणे प्रतिक्रिया दिली आहे.

boney-kapoor-did-not-approved-arjun-and-janhvi-s-relationship-know-what-he-said | 'त्यांच्या रिलेशनला मंजुरी दिली नाही..'; जान्हवी, अर्जुनच्या अफेअरला बोनी कपूर यांचा विरोध?

'त्यांच्या रिलेशनला मंजुरी दिली नाही..'; जान्हवी, अर्जुनच्या अफेअरला बोनी कपूर यांचा विरोध?

आजवरच्या कारकिर्दीत अनेक सुपरहिट सिनेमा देणारे निर्माता म्हणजे बोनी कपूर (boney-kapoor). एकेकाळी गाजलेल्या सिनेमांमुळे चर्चेत येणारे बोनी कपूर सध्या त्यांच्या तीनही मुलांमुळे चर्चेत येत आहे. गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर त्यांच्या धाकट्या लेकीच्या खुशी कपूरच्या (khushi kapoor) अफेअरची चर्चा रंगली आहे. यावर आता पहिल्यांदाच बोनी कपूर यांनी त्यांची प्रतिक्रिया दिली आहे. इतकंच नाही तर त्यांनी खुशीसोबत जान्हवी (janhavi kapoor)  आणि अर्जुन (arjun kapoor) यांच्या अफेअरविषयीदेखील भाष्य केलं आहे.

बोनी कपूर यांनी अलिकडेच 'न्यूज 18' ला मुलाखत दिली. यावेळी त्यांनी त्यांच्या तीनही मुलांच्या रिलेशनशीपवर भाष्य केलं. इतंकच नाही तर त्यांनी खुशी आणि जान्हवी यांच्या रिलेशनला मान्यता न दिल्याचंही म्हटलं आहे.

नेमकं काय म्हणाले बोनी कपूर?

"त्यांनी काही शिकवावं लागेल अशी कोणतीच वेळ अजूनपर्यंत तरी माझ्यावर आली नाही. हे त्यांचं खासगी आयुष्य आहे. त्यामुळे याविषयी मी त्यांच्याशी फक्त एकदा किंवा दोनदा बोलू शकतो आणि माझं मत मांडू शकतो. मी अर्जुन, खुशी किंवा जान्हवी यांच्या नात्याला काही वेळा मंजुरीही दिली नाही. त्यांचे निर्णय त्यांनाच घ्यायला सांगितले. आमच्या पिढीच्या तुलनेत आजची पिढी खूप लवकर वयात येते किंवा ते मॅच्युअर होतात. त्यामुळे तुम्ही तुमचे विचार त्यांच्यावर थोपवू शकत नाही", असं बोनी कपूर म्हणाले.

दरम्यान, गेल्या काही वर्षांपासून बोनी कपूर यांचा मोठा मुलगा अर्जुन कपूर अभिनेत्री मलायका अरोरा (malaika arora) हिला डेट करत आहे. तर, जान्हवी शिखर पहाडिया याला डेट करत असल्याचं म्हटलं जात आहे. यामध्येच आता त्यांची धाकटी लेक खुशी कपूर हिच्या अफेअरच्याही चर्चा रंगू लागल्या आहेत. खुशी अभिनेता वेदांग रैनाला डेट करत असल्याचं म्हटलं जात आहे. यामध्येच आता अंशुला सुद्धा रोहन ठक्करसोबत रिलेशनमध्ये असल्याची चर्चा आहे.

Web Title: boney-kapoor-did-not-approved-arjun-and-janhvi-s-relationship-know-what-he-said

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.