बोनी कपूर यांनी रामेश्वरमच्या समुद्रात विसर्जित केल्या श्रीदेवी यांच्या अस्थी!
By ऑनलाइन लोकमत | Published: March 4, 2018 01:58 PM2018-03-04T13:58:02+5:302018-03-04T19:28:02+5:30
गेल्या २४ फेब्रुवारीला बॉलिवूडच्या प्रसिद्ध अभिनेत्री श्रीदेवी यांच्या निधनाची बातमी समोर आली अन् कपूर परिवारासह लाखो चाहत्यांना धक्का बसला. ...
ग ल्या २४ फेब्रुवारीला बॉलिवूडच्या प्रसिद्ध अभिनेत्री श्रीदेवी यांच्या निधनाची बातमी समोर आली अन् कपूर परिवारासह लाखो चाहत्यांना धक्का बसला. अनेकांना तर ही बातमी खोटी वाटली. या बातमीत काहीही तथ्यता नसावी म्हणून अनेकांनी देवाजवळ हात जोडले. परंतु वास्तव कोणी बदलू शकत नाही, हेच अंतिम सत्य असल्याने अत्यंत जड अंत:करणाने श्रीदेवी यांच्या निधनाची बातमी अखेर त्यांच्या चाहत्यांनी स्वीकारली. वयाच्या ५४व्या वर्षी या जगाचा निरोप घेणाºया श्रीदेवी यांचे पार्थिव दुबई येथून २७ फेब्रुवारी रोजी भारतात आणण्यात आले. २८ फेब्रुवारीला त्यांच्या पार्थिवावर अतिशय शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. देशभरातील चाहते श्रीदेवी यांच्या अंत्ययात्रेत सहभागी झाले होते.
त्यानंतर २ मार्चला पत्नी श्रीदेवी यांच्या अस्थी घेऊन बोनी कपूर रामेश्वरमला रवाना झाले. याठिकाणी ते काल पोहोचले होते. बोनी कपूरसोबत यावेळी त्यांच्या दोन्ही मुली जान्हवी आणि खुशी उपस्थित होत्या. यावेळी बोनी कपूर यांनी श्रीदेवी यांच्या अस्थी रामेश्वरम येथील समुद्रात विसर्जित केल्या. याबाबतचा एक फोटो समोर आला असून, त्यामध्ये बोनी कपूर पत्नी श्रीदेवी यांच्या अस्थी विसर्जित करताना दिसत आहेत. यावेळी फोटोमध्ये जान्हवी आणि खुशी याही दिसत आहेत.
श्रीदेवी यांनी वयाच्या चौथ्या वर्षापासून अभिनयाला सुरुवात केली होती. त्यांनी जवळपास ३०० चित्रपटांमध्ये काम केले. सौंदर्य आणि दमदार अभिनय अशी ओळख असलेल्या श्रीदेवी यांनी वयाची ५० वर्षे भारतीय सिनेमाला समर्पित केली. अभिनयाप्रती त्यांची ओढ लक्षात घेता भारतातील पहिल्या महिला सुपरस्टार म्हणून त्यांचा उल्लेख केला जातो. आज जरी श्रीदेवी आपल्यात नसल्या तरी चाहत्यांच्या हृदयात त्या कायम असणार आहेत.