श्रीदेवी यांचं आयुष्य मोठ्या पडद्यावर? बायोपिकबद्दल बोनी कपूर म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Published: December 1, 2023 01:00 PM2023-12-01T13:00:44+5:302023-12-01T13:15:30+5:30

गेल्या काही दिवसांपासून श्रीदेवी यांच्यावर बायोपिक येणार अशी चर्चा सुरु होती. यावर बोनी कपूर यांनी मोठा निर्णय घेतला आहे. 

Boney Kapoor on Sridevi biopic | श्रीदेवी यांचं आयुष्य मोठ्या पडद्यावर? बायोपिकबद्दल बोनी कपूर म्हणाले...

श्रीदेवी यांचं आयुष्य मोठ्या पडद्यावर? बायोपिकबद्दल बोनी कपूर म्हणाले...

बॉलिवूडची चांदनी अर्थात अभिनेत्री श्रीदेवी. सौंदर्यानं आणि अभिनयानं श्रीदेवी यांनी प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं.  आपली वेगळी छाप पाडणाऱ्या श्रीदेवीचं २४ फेब्रुवारी २०१८ रोजी दुर्दैवी निधन झालं. त्याचं जाणं हे बॉलिवूड सिनेसृष्टीसाठी मोठा धक्का आणि कधीही न भरून येणारी पोकळी होती. श्रीदेवीच्या आकस्मिक निधनाने अवघ्या मनोरंजन विश्वालाच मोठा धक्का बसला होता. गेल्या काही दिवसांपासून श्रीदेवी यांच्यावर बायोपिक येणार अशी चर्चा सुरु होती. यावर बोनी कपूर यांनी मोठा निर्णय घेतला आहे. 

देवीच्या आयुष्यातील आणि कारकिर्दीतील ठळक पैलू उलघडणारा बायोपीक यावा, अशी चाहत्यांची इच्छा आहे. आता बोनी कपूर यांनी याविषयी चाहत्यांना माहिती दिली आहे. श्रीदेवीवर कधीही बायोपिक बनवणार नसल्याचे त्यांनी सांगितले आहे. ते म्हणाले की, 'मी तिच्यावर कधीही बायोपिक बनवणार नाही. तिच्या जीवनावर चित्रपट बनवण्याच्या अनेक ऑफर मला आल्या, पण मी त्यासाठी तयार नाही. ही माझ्यासाठी अत्यंत वैयक्तिक बाब आहे'.

पुढे ते म्हणाले, श्रीदेवीच्या आयुष्यावर किंवा तिच्याबद्दल काही जण पुस्तक लिहित आहेत. तिच्या आयुष्यावर एखादं पुस्तक लिहिण्याचीदेखील माझी इच्छा नाही, आमची लव्हस्टोरी नेहमीच माझी वैयक्तिक असेल, श्री माझ्या हृदयाच्या जवळ आहे. आम्ही प्रेमात कसे पडलो आणि लग्न कसे केले ही माझी वैयक्तिक बाब आहे, जी मला प्रेक्षकांसोबत शेअर करता येणार नाही'. बोनी कपूर यांच्या या निर्णयामुळे चाहते नाराज झाले आहेत.  श्रीदेवीनंतर त्यांची मुलगी जान्हवी कपूर सिनेसृष्टीत सक्रीय झाली आहे. धडक या सिनेमातून जान्हवीनं बॉलिवूडमध्ये एन्ट्री केली. 
 

Web Title: Boney Kapoor on Sridevi biopic

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.