बोनी कपूर बनवणार ‘एफ 2’चा हिंदी रिमेक!!
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 29, 2019 14:26 IST2019-03-29T14:22:32+5:302019-03-29T14:26:57+5:30
श्रीदेवीचे पती आणि निर्माते बोनी कपूर लवकरच साऊथच्या एका ब्लॉकबस्टर चित्रपटाचा हिंदी रिमेक घेऊन प्रेक्षकांच्या भेटीस येत आहेत. होय, या साऊथ चित्रपटाचे नाव काय तर,‘एफ 2’.

बोनी कपूर बनवणार ‘एफ 2’चा हिंदी रिमेक!!
श्रीदेवीचे पती आणि निर्माते बोनी कपूर लवकरच साऊथच्या एका ब्लॉकबस्टर चित्रपटाचा हिंदी रिमेक घेऊन प्रेक्षकांच्या भेटीस येत आहेत. होय, या साऊथ चित्रपटाचे नाव काय तर,‘एफ 2’. तेलगू भाषेतील या ‘एफ 2’ या विनोदीपटाने जगभरात १०० कोटींपेक्षा अधिकचा बिझनेस केला होता. बोनी कपूर यांनी या तेलगू चित्रपटाने हक्क विकत घेतले असून लवकरच या चित्रपटाचा हिंदी रिमेक प्रेक्षकांना पाहता येणार आहे.
चित्रपटाची घोषणाही झालीय. या रिमेकसाठी बोनी यांनी ‘एफ 2’चे निर्माते दिल राजूसोबत हात मिळवला आहे. तर रिमेकच्या दिग्दर्शनाची जबाबदारी अनीज बज्मी यांच्यावर सोपवली आहे.साऊथच्या या ब्लॉकबस्टर चित्रपटात साऊथ सुपरस्टार व्यंकटेश लीड रोलमध्ये होता. याशिवाय वरूण तेज, तमन्ना भाटिया आणि मेहराजा पीरजादा यांच्याही यात महत्त्वपूर्ण भूमिका होत्या.
बोनी कपूर यांचे मानाल तर, हा एक मजेदार कौटुंबिक चित्रपट आहे. बॉलिवूड चाहत्यांना या चित्रपटाचा हिंदी रिमेक नक्की आवडेल, असा बोनी यांना विश्वास आहे.
‘एफ 2’ या चित्रपटाखेरीज बोनी कपूर ‘पिंक’ आणि ‘बधाई हो’ या बॉलिवूड चित्रपटांच्या साऊथ रिमेकमध्ये बिझी आहे. साऊथ भाषेत या दोन्ही चित्रपटांचे रिमेक बनत आहेत. ‘पिंक’च्या साऊथ रिमेकसाठी त्यांनी सुपरस्टार अजित कुमारला साईन केले आहे. अजित यात अमिताभ यांची भूमिका साकारताना दिसेल. याऊलट ‘बधाई हो’ एक नाही, दोन नाही तर तब्बल ९ भाषांत बनणार आहे.