Video: जान्हवी कपूरच्या बॉयफ्रेंडवर बोनी कपूर नाराज?; एकत्र फोटो काढण्यास दिला नकार
By ऑनलाइन लोकमत | Published: March 12, 2024 12:07 PM2024-03-12T12:07:40+5:302024-03-12T12:08:59+5:30
Boney Kapoor: 'आमचा एकत्र फोटो काढू नका'; जान्हवी कपूरच्या बॉयफ्रेंडसोबत फोटो काढण्यास बोनी कपूरने दिला नकार
बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूर सध्या तिच्या प्रोफेशनल लाइफपेक्षा पर्सनल आयुष्यामुळे जास्त चर्चेत येत आहे. जान्हवी प्रसिद्ध बिझनेसमन शिखर पहाडिया (shikhar pahariya) याला डेट करत असल्याचं म्हटलं जात आहे. अनेक ठिकाणी या दोघांना एकत्र स्पॉट करण्यात आलं आहे. यामध्येच पहिल्यांदाच शिखर, निर्माते आणि जान्हवीचे वडील बोनी कपूर ( Boney Kapoor) यांच्यासोबत स्पॉट झाला. मुंबई विमानतळावर हे दोघं एकत्र स्पॉट झाले. मात्र, यावेळी बोनी कपूर यांनी शिखरसोबत फोटो काढण्यास नकार दिला. त्यांचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
सध्या सोशल मीडियावर बोनी कपूर आणि शिखर पहाडिया यांचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. यामध्ये दोघेही एकाच गाडीतून मुंबई विमानतळावर पोहोचले. त्यांना पाहिल्यावर पापाराझी त्यांचे फोटो काढण्यासाठी पुढे सरसावले. मात्र, बोनी कपूर यांनी शिखरसोबत फोटो काढण्यास मनाई केली.
या दोघांना फोटोग्राफरने एकत्र पोझ देण्यास सांगितलं. त्यावर, "आमचा एकत्र फोटो नको. त्याचा फोटो टाकूच नका", असं म्हणत बोनी कपूर यांनी फोटो काढण्यास नकार दिला.
दरम्यान, अलिकडेच जान्हवीने तिचा २७ वा वाढदिवस साजरा केला. यावेळी तिने तिरुपतीमधील तिरुमाला मंदिराचं दर्शन घेतलं. यावेळी शिखरदेखील तिच्यासोबत होता. सध्या बोनी कपूर त्यांच्या मैदान या सिनेमाच्या रिलीजच्या तयारीत आहेत. तर जान्हवी 'सनी संस्कारी की तुलसी कुमारी', 'मिस्टर अँड मिसेज माही', 'उलझन', 'आरसी 16' आणि 'देवारा: पार्ट 1' या सिनेमांमध्ये झळकणार आहे.