बोनीची अर्जूनला तंबी?
By ऑनलाइन लोकमत | Published: May 12, 2016 12:30 PM2016-05-12T12:30:35+5:302016-05-12T18:00:35+5:30
अरबाजसोबतचे लग्न तुटले नि तुटले तेव्हापासून मलाईका अरोरा चर्चेत आहे. बी-टाऊनमध्ये सध्या मलाईका व अर्जून कपूर यांच्या अफेअरची जोरदार ...
अ बाजसोबतचे लग्न तुटले नि तुटले तेव्हापासून मलाईका अरोरा चर्चेत आहे. बी-टाऊनमध्ये सध्या मलाईका व अर्जून कपूर यांच्या अफेअरची जोरदार चर्चा आहे. या दोघांचे एकत्रित छायाचित्रेही अलीकडे समोर आली. एवढेच नाही तर रात्री उशीरापर्यंत हे दोघे एकत्र दिसल्याच्या बातम्याही आल्यात. या सर्व चर्चांमुळे अर्जूनचे वडील बोनी कपूर सध्या जाम वैतागले आहेत. एवढेच नाही तर हे सगळे थांबावे म्हणून बोनीने काहीसा कडक पावित्रा घेतल्याचीही खबर आहे. होय, मलाईकापासून दूर राहा, अशी तंबी बोनी यांनी अर्जूनला दिली आहे. अरबाजच्या एक्ससोबतच्या अफेअरच्या बातम्यांमुळे अर्जूनचे करिअर धोक्यात येईल, असे बोनीला वाटते. याशिवाय यामुळे सलमान खानची नाराजीही विकत घेतल्यासारखे होईल, असेही बोनीला वाटते. तूर्तास तरी खान फॅमिलीसोबत कुठलेही शत्रूत्व बोनीला नको आहे. अरबाजसोबतचे नाते संपुष्टात आणल्यानंतर मलाईका-अर्जून अनेक ठिकाणी एकत्र दिसले. अरबाज व मलाईका सहा महिन्यांपर्यंत विभक्त राहणार आहेत. यानंतर ते घटस्फोटाबाबत अंतिम निर्णय घेणार आहेत. आता या प्रकरणाला बोनीने दिलेल्या तंबीनंतर कसे वळण मिळते, ते बघू.