Book My Show च्या २०२४ इअर एन्ड रिपोर्टचे अनावरण; मनोरंजनाचं एक ब्लॉकबस्टर वर्ष

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 21, 2024 15:39 IST2024-12-21T15:37:35+5:302024-12-21T15:39:01+5:30

बुक माय शोच्या year end wrap मध्ये वर्षभरांतील काही महत्त्वाच्या घटना, रुपेरी पडद्यावरील काही सिनेमॅटिक अनुभव, लाईव्ह मनोरंजनात मोठी वाढ आणि जागतिक स्टोरी टेलिंग क्षेत्राने सुध्दा दिले बुक माय शो स्ट्रीमला प्राधान्य.

Book My Show 2024 Year End Report Unveiled A Blockbuster Year for Entertainment and Experiences | Book My Show च्या २०२४ इअर एन्ड रिपोर्टचे अनावरण; मनोरंजनाचं एक ब्लॉकबस्टर वर्ष

Book My Show च्या २०२४ इअर एन्ड रिपोर्टचे अनावरण; मनोरंजनाचं एक ब्लॉकबस्टर वर्ष

दिल्ली, 20 डिसेंबर: जसजसे २०२४ हे वर्ष संपत येऊ लागले आहे तसे बुकमायशो तर्फे त्यांच्या #BookMyShowThrowback चे अनावरण करण्यात आले आहे. या माध्यमातून भारतातील मनोरंजन क्षेत्रातील मोठ्या बदलांकडे पाहण्याचा नवीन दृष्टिकोन समोर आला आहे. अगदी आयकॉनिक सिनेमॅटिक अनुभवासह मनोरंजनात्मक असे लाईव्ह कार्यक्रम आणि ऑन डिमांड स्ट्रिमिंग मधील होणारी वाढ ही या वर्षीच्या मनोरंजनात्मक स्वप्नांमध्ये दिसून आली. तसेच भारतीय प्रेक्षक सर्व प्रकारचे मनोरंजन पाहण्यासाठी उत्सुक आहेत हेही यातून दिसून आले.

पुष्पा २: द रुल ने सिनेमॅटिक मनोरंजनाचं शिखर गाठलं असतानाच या सिनेमाने भारतीय कथानकांमध्ये वाढ केली आहे, कारण हा चित्रपट वर्षातील सर्वाधिक पाहिलेला चित्रपट ठरला असून १०.८ लाख लोकांनी हा चित्रपट पाहिला आहे.  १ नोव्हेंबर २०२४ हा दिवस बुक माय शोसाठी ब्लॉकबस्टर डे ठरला, या दिवशी २४ तासांमध्ये २.३ दशलक्ष तिकीटे या मंचावरुन विकली गेली.

रि रिलीज सिनेमांनाही मिळाला प्रतिसाद

कल हो ना हो, रॉकस्टार आणि लैला मजनू चित्रपटांनाही मोठा प्रतिसाद मिळाला. दुसरीकडे डेडपूल ॲन्ड वोल्व्हारिन आणि गॉड्झिला X काँग: द न्यू एम्पायर सरख्या आंतरराष्ट्रीय सिनेमांनी सुध्दा स्क्रीनवर धुमाकूळ घालून लोकांचे मनोरंजन केले. चित्रपट रसिकांची आवड ही अजोड होती, कारण एका सिनेफाईलने  तर विक्रमी असे २२१ चित्रपट पाहिले आहेत.

थेट कार्यक्रमाच्या बाबतीत बोलायचे झाल्यास २०२४ मध्ये अनेक सिंफनींनी प्रेक्षकांची मने जिंकली. २०२४ मध्ये बुकमायशो तर्फे ३१९ शहरांमध्ये विविध अशा ३०,६८७ लाइव्ह इव्हेंटची विस्तृत शृंखला आयोजित केली, ज्याने २०२४ मध्ये भारतातील थेट करमणूक वापरामध्ये उल्लेखनीय अशी १८ टक्के वाढ दर्शवली.

लाईव्ह कॉन्सर्ट्स 

यावर्षाची सुरुवात ही निक जोनास आणि जोनास ब्रदर्सच्या लोल्लापोझ्झा इंडिया २०२४ ने त्यांच्या पहिल्या अशा जिजू जिजू या गाण्याने झाली. एड शीरन आणि दिलजित दोसांजच्या जोडीने सुध्दा देशभरात धुमाकूळ घातला. नवीन विक्रम निर्माण करत जागतिक स्तरावरील स्थानिक कार्यक्रमांची मांदियाळी निर्माण केली. मरुन ५ ने (maroon 5) विकडे कॉन्सर्ट्समधूनही अधिक मनोरंजन केले. या वर्षातील प्रेक्षकांची सर्वाधिक आवड असलेल्या बॅन्डलँड २०२४ मधील ॲव्हेंज्ड सेव्हनफोल्ड मुळे आता प्रेक्षक २०२५ मध्ये आनंदाने प्रवेश करतील.

म्युझिक टुरिझममध्ये सुध्दा या वर्षी मोठी वाढ दिसून आली. संगिताचे कार्यक्रम पाहण्यासाठी यावर्षी ४,७७,३९३ प्रेक्षकांनी त्यांच्या शहराबाहेर प्रवास केला. भारतात आलेल्या कोल्डप्लेच्या म्युझिक ऑफ दि स्पिअर वर्ल्ड टूर ही २८ राज्यातील ५०० हून अधिक शहरात आयोजित करण्यात आली आणि अहमदाबाद मध्ये सुध्दा लाईव्ह एन्टरटेन्मेंटचा आनंद प्रेक्षकांनी घेतला. टिअर २ शहरांमध्ये सुध्दा लाईव्ह कार्यक्रमांमध्ये मोठी म्हणजेच ६८२ टक्क्यांची मोठी वाढ दिसून आली, यामध्ये कानपूर,‍ शिलाँग आणि गांधीनगर सारख्या शहरांचाही समावेश आहे. यांतून संपूर्ण भारतातील मनोरंजनाचे लोकशाहीकरण होतांना दिसून येते.

यावर्षी मोठी नावे आणि मोठे मंच नव्हते- यावर्षी प्रत्येक प्रकारच्या कथाकथनाला सुध्दा लोकांनी गर्दी केली होती. छोट्या बजेटचे चित्रपट जसे मंजुम्मेल बॉईज, आवेशम्, लापता लेडीज आणि मेरी क्रिसमस यांनी सुध्दा प्रमाण छोटे असून सुध्दा मोठा परिणाम साधला.  विनोद, कला आणि आकर्षक अनुभव सुध्दा प्रेक्षकांना न्याकालँड २०२४, व्हॅन गॉफ ३६० आणि पारिवारीक रत्ने असलेल्या पेप्पा  पिग्ज ॲडव्हेंचर लाईव्ह मुळे लोकांचे उत्तम मनोरंजन झाले.

या वर्षी स्ट्रिमिंगने सुध्दा नवीन उंची गाठत बुक माय शो स्ट्रीम वरुन लोकांनी १,०७,०२३ तासांच्या मनोरंजनाचा आनंद घेतला.  यांत २,९७८ चित्रपटांच्या लायब्ररी पैकी ४४६ नवीन चित्रपटांचा समावेश असून यामुळे हा मंचा गो टू असा मंच ठरला.  यामध्ये जागतिक हिट्स ड्यून:पार्ट टू हा स्थानिक चित्रपट असलेल्या धुमम आणि आझम बरोबरचा उत्तम चित्रपट ठरला, यांतून वैविध्यपूर्ण कथांना लोक प्राधान्य देतात हे दिसून आले.

प्रेक्षक हे फक्त कार्यक्रम किंवा चित्रपटांनाच हजेरी लावत नव्हते तर ते मनोरंजन जगत होते.  जवळजवळ ८,८७,१६६ लोकांनी एकट्याने कार्यक्रमात भाग घेतला, यांतून असे दिसून येते की लोक एकट्याने सुध्दा कार्यक्रमांचा आनंद घेतात.  मुंबईच्या गुंजन सारख्या फॅन्सने तर १५७ कार्यक्रमांत भाग घेतला व एकट्याने सुध्दा कार्यक्रमाचा आनंद घेता येतो ते दर्शवले.  लाईव्ह कार्यक्रमात प्रिमियम अनुभव घेण्यातही मोठी म्हणजेच १२३ टक्क्यांची वाढ होऊन विशेष कार्यक्रमा बरोबरच भोजन आणि वस्तूंचा ही आनंद घेतल्याने बुकमायशो लाईव्ह ने सुध्दा मनोरंजनाचा अनुभवही समृध्द केला. 

यावर्षी बुकमायशो २०२४ कडे वळून पाहतांना हे स्पष्ट दिसून येते की ही केवळ आकडेवारी आणि महत्त्वाचे टप्पे नाहीत.  हे वर्ष स्वप्नपूर्तीचे, कथानके जगण्याचे आणि स्मृती निर्माण करण्याचे ठरले.  बुकमायशोथ्रोबॅक आता आजवरचा प्रवास साजरा करुन पुढील आकर्षक वर्षासाठी तयार होत आहे कारण नेहमीच #ItAllStartsHere. ही माहिती १ जानेवारी ते ५ डिसेंबर २०२४ दरम्यानची आहे. 

Web Title: Book My Show 2024 Year End Report Unveiled A Blockbuster Year for Entertainment and Experiences

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.