Gadar 2 Collection Day 18 : सनी पाजीच्या 'गदर २'ची जगभरातील बॉक्स ऑफिसवर छप्पर फाड कमाई

By ऑनलाइन लोकमत | Published: August 29, 2023 01:24 PM2023-08-29T13:24:55+5:302023-08-29T13:27:45+5:30

गदर २ ने कमाईच्या बाबतीत 'दंगल', 'केजीएफ-2' सारख्या चित्रपटांना मागे टाकले आहे.

box office gadar 2 box office collection day 18 sunny deol ameesha patel film total earning in india and worldwide on monday | Gadar 2 Collection Day 18 : सनी पाजीच्या 'गदर २'ची जगभरातील बॉक्स ऑफिसवर छप्पर फाड कमाई

Gadar 2 Collection Day 18 : सनी पाजीच्या 'गदर २'ची जगभरातील बॉक्स ऑफिसवर छप्पर फाड कमाई

googlenewsNext

सनी देओलचा अ‍ॅक्शन ड्रामा चित्रपट 'गदर 2' पहिल्या दिवसापासून बम्पर कमाई करतो आहे. अमीषा पटेल आणि सनी देओल स्टारर चित्रपटाला २२ वर्षांनंतर दुप्पट प्रेम मिळत आहे. 'तारा सिंग' उर्फ ​​सनी देओलसह देशभरातील प्रेक्षक 'हिंदुस्तान झिंदाबाद'चा नारा देत आहेत.


पहिल्या आणि दुसऱ्या वीकेंडनंतर, सनी देओल स्टाररचा तिसरा वीकेंड देखील बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरला. 'गदर 2' ने रविवारी भारतात 450 कोटी रुपयांचा टप्पा पार आहे. सोमवारनंतर चित्रपटाने भारतात किती कमाई केली? हे जाणून घेऊया. 

रविवारी सनी देओलच्या चित्रपटाने कमाईच्या बाबतीत आयुषमान खुरानाच्या 'ड्रीम गर्ल 2' चित्रपटाला मागे टाकले. या चित्रपटाने  17 कोटींची कमाई केली. Sanlik.com च्या रिपोर्टनुसार, सोमवारी सनी देओल-अमिषा पटेल आणि उत्कर्ष शर्मा स्टारर चित्रपटाने केवळ 4.5 कोटी होते. भारतातील 'गदर 2'चे एकूण कलेक्शन 460.55 कोटींवर पोहोचले आहे. ज्या वेगाने हा चित्रपट कमाई करतो आहे, ते पाहता हा चित्रपट शाहरुख खानचा 'जवान' रिलीज होण्यापूर्वीच 500 कोटींची कमाई करू शकतो असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही.

दरम्यान, देशासह विदेशातही गदर २ धुमाकूळ घालत आहे. ऑस्ट्रेलिया, जर्मनी, अमेरिका आणि यूके सारख्या देशांमध्ये सुद्धा गदर २ पाहण्यासाठी प्रेक्षक गर्दी करत आहेत. या चित्रपटाने कमाईच्या बाबतीत 'दंगल', 'केजीएफ-2' सारख्या चित्रपटांना मागे टाकले आहे. सनी देओलच्या चित्रपटाने रविवारी जगभरात 593 कोटींची कमाई केली होती.

Web Title: box office gadar 2 box office collection day 18 sunny deol ameesha patel film total earning in india and worldwide on monday

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.