BOX OFFICE : राणी मुखर्जीच्या ‘हिचकी’ची अपेक्षेपेक्षा चांगली कमाई!

By ऑनलाइन लोकमत | Published: March 25, 2018 04:21 PM2018-03-25T16:21:33+5:302018-03-25T21:53:56+5:30

अभिनेत्री राणी मुखर्जी हिचा कमबॅक चित्रपट ‘हिचकी’ या शुक्रवारी म्हणजेच २३ मार्च रोजी प्रदर्शित झाला. आतापर्यंत चित्रपट अपेक्षेपेक्षा खूप ...

BOX OFFICE: Rani Mukherjee's hiccups earn better than expected! | BOX OFFICE : राणी मुखर्जीच्या ‘हिचकी’ची अपेक्षेपेक्षा चांगली कमाई!

BOX OFFICE : राणी मुखर्जीच्या ‘हिचकी’ची अपेक्षेपेक्षा चांगली कमाई!

googlenewsNext

अभिनेत्री राणी मुखर्जी हिचा कमबॅक चित्रपट ‘हिचकी’ या शुक्रवारी म्हणजेच २३ मार्च रोजी प्रदर्शित झाला. आतापर्यंत चित्रपट अपेक्षेपेक्षा खूप चांगले प्रदर्शन करताना दिसत आहे. प्रेक्षकांबरोबर समीक्षकांनीही चित्रपटाचे कौतुक केले आहे. असा अंदाज लावला जात होता की, पहिल्या दिवशी हा चित्रपट दोन कोटी रूपयांची कमाई करेल. परंतु चित्रपटाने पहिल्याच दिवशी ३.३० कोटी रूपयांचा गल्ला जमविला. ट्रेड एनालिस्ट तरण आदर्शने आपल्या ट्विटर अकाउंटवर चित्रपटाच्या कमाईचे आकडे सांगताना लिहिले की, ‘डे वनपासून ‘हिचकी’ने प्रोग्रेस केले. शनिवार आणि रविवारी चित्रपट आणखी चांगली कमाई करू शकतो.’

या अगोदर तरण आदर्श यांनी अंदाज लावला होता की, चित्रपट आपल्या ओपनिंग डेला दोन कोटी रूपयांची कमाई करेल. मात्र पहिल्याच दिवशी अपेक्षेपेक्षा जास्त कमाई केल्याने वीकेण्डपर्यंत हा चित्रपट ७ ते ८ कोटी रूपयांची कमाई करण्याची शक्यता आहे. ‘हिचकी’ हा चित्रपट केवळ १२ कोटी रूपयांमध्ये बनविण्यात आला आहे. तरण आदर्श यांच्या अंदाजानुसार या चित्रपटाने २० कोटी रूपयांची जरी कमाई केली तरी, हा चित्रपट नफ्यात असेल. तरण आदर्शने आपल्या वन वर्ड रिव्ह्यूमध्ये या चित्रपटाला पावरफुल असे म्हटले आहे. तसेच ताडेतीन स्टारही दिले आहेत. 

#Hichki shows a REMARKABLE 62.12% GROWTH on Day 2... Sun biz to scale HIGHER than Sat... Fri 3.30 cr, Sat 5.35 cr. Total: ₹ 8.65 cr [961 screens]. India biz.

What makes #Hichki an OUTRIGHT WINNER is the perfect blend of super content + right economics... While the theatrical biz is going strong, Yash Raj has already recovered *entire* investment [₹ 20 cr] from non-theatrical platforms [Digital, Satellite, Music].

दरम्यान, या चित्रपटाच्या माध्यमातून अभिनेत्री राणी मुखर्जी हिने चार वर्षांनंतर कमबॅक केले आहे. या अगोदर राणी ‘मर्दानी’ या चित्रपटात बघावयास मिळाली होती. या चित्रपटात राणीने एका महिला पोलीस अधिकाºयाची भूमिका साकारली होती, तर या चित्रपटात राणी अशा एका शिक्षिकेची भूमिका साकारत आहे, जी टॉरेंट सिंड्रोम या आजाराने ग्रस्त आहे. राणीचा हा अंदाज प्रेक्षकांना खूप चांगला भावत असून, त्यास चांगल्या प्रतिक्रिया मिळत आहेत. 

Web Title: BOX OFFICE: Rani Mukherjee's hiccups earn better than expected!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.