BOX OFFICE : तिसरा वीकेण्ड संपताच ‘टायगर जिंदा है’च्या नावे होणार तीन मोठ्या रेक्रॉर्डची नोंद!

By ऑनलाइन लोकमत | Published: January 5, 2018 04:21 PM2018-01-05T16:21:32+5:302018-01-05T21:51:32+5:30

बॉक्स आॅफिसवर तब्बल १४ दिवस दबदबा दाखविणाºया सलमान खान आणि कॅटरिना कैफच्या ‘टायगर जिंदा है’ने तीन मोठे रेक्रॉर्ड आपल्या ...

BOX OFFICE: Record of three big records for the third weekend, in the name of 'Tiger Jinda Hai'! | BOX OFFICE : तिसरा वीकेण्ड संपताच ‘टायगर जिंदा है’च्या नावे होणार तीन मोठ्या रेक्रॉर्डची नोंद!

BOX OFFICE : तिसरा वीकेण्ड संपताच ‘टायगर जिंदा है’च्या नावे होणार तीन मोठ्या रेक्रॉर्डची नोंद!

googlenewsNext
क्स आॅफिसवर तब्बल १४ दिवस दबदबा दाखविणाºया सलमान खान आणि कॅटरिना कैफच्या ‘टायगर जिंदा है’ने तीन मोठे रेक्रॉर्ड आपल्या नावे करण्याच्यादृष्टीने घोडदौड सुरू केली आहे. ट्रेडच्या मते, १४व्या दिवशी ज्या पद्धतीने चित्रपटाने कलेक्शन केले, त्यावरून आणखी काही दिवस हा चित्रपट बॉक्स आॅफिसवर आपला करिश्मा दाखवेल. आजपासून ‘टायगर जिंदा है’चा तिसरा वीकेण्ड सुरू झाला असून, या आठवड्यात चित्रपट तीन मोठे रेक्रॉर्ड आपल्या नावे करण्याची शक्यता आहे. 

१) आतापर्यंतच्या सलमान खानच्या दोन चित्रपटांनी ३०० कोटींच्या क्लबमध्ये स्थान मिळविले आहे. ‘सुलतान’ (३००.४५ कोटी) आणि बजरंगी भाईजान (३०० कोटी) या चित्रपटांनी बॉक्स आॅफिसवर आपला जलवा दाखविला. त्यामुळे ट्रेडला अपेक्षा आहे की, ‘टायगर जिंदा है’ तीसरा वीकेण्ड संपताच ३०० कोटींच्या क्लबमध्ये स्थान मिळवेल. 

२) महाराष्ट्रात जेव्हापासून वाद सुरू झाला तेव्हापासून ‘टायगर जिंदा है’च्या कमाईवर परिणाम झाला आहे. मात्र अशातही हा चित्रपट २०१७ मधील सर्वाधिक कमाई करणाºया चित्रपटांच्या यादीत दुसºया स्थानावर असेल. त्याचबरोबर ‘सुलतान’च्या कमाईचा रेक्रॉर्डही ब्रेक करेल. 

३) ‘टायगर जिंदा है’ या चित्रपटाने जर बॉक्स आॅफिसवर ३००.४५ कोटींचा आकडा पार केला तर हा चित्रपट हिंदी सिनेमाच्या इतिहासात सर्वाधिक कमाई करणाºया टॉप फाइव्ह चित्रपटांमध्ये स्थान मिळवेल. या अगोदर खालील चित्रपटांची कमाई सर्वाधिक राहिली आहे. 

- बाहुबली- २ (हिंदी व्हर्जन) : ५१०.९८ कोटी
-  दंगल : ३८७.३८ कोटी
- पीके : ३४०.८० कोटी 
- बजरंगी भाईजान : ३२०.३४ कोटी 
- सुलतान : ३००.४५ कोटी 

Web Title: BOX OFFICE: Record of three big records for the third weekend, in the name of 'Tiger Jinda Hai'!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.