BOX OFFICE : दुसऱ्या आठवड्यातही ‘रेड’चा जोर कायम; आतापर्यंत केली इतक्या कोटींची कमाई!
By ऑनलाइन लोकमत | Published: March 25, 2018 03:47 PM2018-03-25T15:47:13+5:302018-03-25T21:17:30+5:30
बॉलिवूड स्टार अजय देवगणचा ‘रेड’ हा चित्रपट बॉक्स आॅफिसवर चांगले प्रदर्शन करताना दिसत आहे. चित्रपटात अजय देवगण व्यतिरिक्त सौरभ ...
ब लिवूड स्टार अजय देवगणचा ‘रेड’ हा चित्रपट बॉक्स आॅफिसवर चांगले प्रदर्शन करताना दिसत आहे. चित्रपटात अजय देवगण व्यतिरिक्त सौरभ शुक्ला आणि इलियाना डिक्रूजच्या प्रमुख भूमिका आहेत. चित्रपटात सर्वच पात्रांनी दमदार अभिनय केल्याने चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस येत आहे. त्यामुळेच आतापर्यंत चित्रपटाने बॉक्स आॅफिसवर ७२.३१ कोटी रूपयांची कमाई केली आहे. सध्या चित्रपट दुसºया आठवड्यात असून, शंभर कोटींच्या क्लबमध्ये पोहोचेल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. दरम्यान, चित्रपटाने पहिल्याच दिवशी १०.०४ कोटींची कमाई केली होती. शनिवारी १३.८, तर रविवारी १७.११ कोटी रूपयांची कमाई करीत बॉक्स आॅफिसवर आपला दबदबा निर्माण केला. सोमवारी ६.२६ कोटी, मंगळवारी ५.७६ कोटी, बुधवारी ५.३६ कोटी, तर गुरुवारी ४.६६ कोटी रूपयांची कमाई केली आहे.
दरम्यान, नव्या आठवड्याच्या पहिल्याच शुक्रवारी चित्रपटाने ३.५५ कोटी रूपयांची कमाई केली. शनिवारी कमाईत वाढ होत चित्रपटाने ५.७१ कोटी रूपयांचा गल्ला जमविला. ट्रेड एनालिस्ट तरण आदर्शने कमाईचे आकडे त्यांच्या ट्विंटर हॅण्डलवर शेअर केले. त्याचबरोबर चित्रपटाचे कौतुक करताना लिहिले की, ‘रेड’ने दुसºया आठवड्यातही साजेशी कमाई केली आहे.’ दरम्यान, हा चित्रपट देशभरात ३,४०० स्क्रिन्सवर प्रदर्शित करण्यात आला. अन्य देशांमध्ये चित्रपटाला ३६९ स्क्रिन्स मिळाले.
दरम्यान, चित्रपटात अजय देवगणने मुख्य भूमिका साकारली आहे. चित्रपटात अजय इन्कम टॅक्स अधिकाºयाच्या भूमिकेत आहे, तर इलियानाने त्याच्या पत्नीची भूमिका साकारली आहे. निगेटिव्ह भूमिकेत सौरभ शुक्ला असून, त्यांच्या अभिनयाचे सध्या सर्वत्र कौतुक केले जात आहे. त्याचबरोबर सध्या त्यांचे डायलॉगही चांगलेच गाजत आहे. ज्या पद्धतीने चित्रपट बॉक्स आॅफिसवर प्रदर्शन करीत आहे, त्यावरून अजूनही चित्रपट शंभर कोटींचा क्लब गाठेल अशी शक्यता वर्तविली जात आहे.

#Raid is back in form on second Sat... Expected to cross ₹ 75 cr mark tonight [end of Weekend 2]… [Week 2] Fri 3.55 cr, Sat 5.71 cr. Total: ₹ 72.31 cr. India biz.— taran adarsh (@taran_adarsh) March 25, 2018