BOX OFFICE : ‘टायगर जिंदा है’ने सलमान खानच्याच ‘या’ चित्रपटाचे रेकॉर्ड केले ब्रेक!
By ऑनलाइन लोकमत | Published: January 13, 2018 10:44 AM2018-01-13T10:44:33+5:302018-01-13T16:14:55+5:30
बॉलिवूड सुपरस्टार सलमान खानच्या ‘टायगर जिंदा है’ या चित्रपटाने पहिल्या आठवड्यात जबरदस्त कमाई केल्यानंतर त्यानंतरच्या आठवड्यांमध्ये छोटी-मोठी कमाई करीत ...
ब लिवूड सुपरस्टार सलमान खानच्या ‘टायगर जिंदा है’ या चित्रपटाने पहिल्या आठवड्यात जबरदस्त कमाई केल्यानंतर त्यानंतरच्या आठवड्यांमध्ये छोटी-मोठी कमाई करीत अनेक रेकॉर्ड आपल्या नावे केले आहेत. आता तर सलमानने त्याच्याच चित्रपटांचे रेकॉर्ड ब्रेक करण्यास सुरुवात केली आहे. पहिल्या आठवड्यात दोनशे कोटी रुपयांपेक्षा अधिक कमाई केल्यानंतर दुसºया आठवड्यात ८५ कोटी तर तिसºया आठवड्यात २७ कोटी रुपयांचे कलेक्शन करीत तीनशे कोटींच्या क्लबमध्ये स्थान मिळविले. ट्रेड एनालिस्ट तरण आदर्शच्या मते, ११ जानेवारीपर्यंत या चित्रपटाने ३१८.८६ कोटी रुपयांची कमाई केली. शुक्रवारच्या कलेक्शनचा आकडा यामध्ये समाविष्ट केल्यास कमाईत आणखी भर पडण्याची शक्यता आहे.
तर ओवरसीज कमाईचा विचार केल्यास आतापर्यंत चित्रपटाने विदेशात १२२.१२ कोटी रुपयांचे कलेक्शन केले आहे. एकूणच या चित्रपटाने जगभरात ५०० कोटी रुपयांपेक्षा अधिक कलेक्शन केले आहे. पाचशे कोटींच्या क्लबमध्ये स्थान मिळविणारा सलमानचा हा तिसरा चित्रपट ठरला आहे. या अगोदर ‘बजरंगी भाईजान’ आणि ‘सुलतान’ या चित्रपटांनी हा कारनामा केला आहे. असो, बॉक्स आॅफिसवर सलमानच्या ‘बजरंगी भाईजान’ने ३२०.३४ कोटी रुपयांची कमाई केली होती. ‘टायगर जिंदा है’च्या शुक्रवारच्या कमाईचा समावेश केल्यास, सलमानने त्याच्याच चित्रपटाचे रेकॉर्ड ब्रेक केल्याचे आता जवळपास निश्चित झाले आहे.
दरम्यान, सलमान खानचा ‘टायगर जिंदा है’ सर्वाधिक कमाई करणारा तिसरा चित्रपट ठरला आहे. अली अब्बास जफर यांनी दिग्दर्शित केलेला हा चित्रपट २०१२ मध्ये आलेल्या ‘एक था टायगर’चा सीक्वल आहे. त्यावेळी ‘एक था टायगर’ने १५० कोटी रुपयांची कमाई केली होती. चित्रपटाच्या निर्मितीसाठी ७५ कोटी रुपये खर्च आला होता.

#TigerZindaHai biz at a glance...
Week 1: ₹ 206.04 cr
Week 2: ₹ 85.51 cr
Week 3: ₹ 27.31 cr
Total: ₹ 318.86 cr
India biz. #TZH
BLOCKBUSTER.— taran adarsh (@taran_adarsh) January 12, 2018