BOX OFFICE : ‘टायगर जिंदा है’ने ‘गोलमाल अगेन’ला केले ओव्हरटेक; ३०० कोटींचा आकडा केला पार!

By ऑनलाइन लोकमत | Published: December 29, 2017 11:36 AM2017-12-29T11:36:40+5:302017-12-29T17:12:11+5:30

२०१७ मध्ये ‘बाहुबली-२’नंतर जबरदस्त कमाई करणाºया ‘गोलमाल अगेन’ला बॉलिवूडचा दबंग सलमान खानच्या ‘टायगर जिंदा है’ चित्रपटाने ओव्हरटेक केले आहे. ...

BOX OFFICE: 'Tiger is alive' overtakes 'Golmaal again'; 300 crore mark crossing! | BOX OFFICE : ‘टायगर जिंदा है’ने ‘गोलमाल अगेन’ला केले ओव्हरटेक; ३०० कोटींचा आकडा केला पार!

BOX OFFICE : ‘टायगर जिंदा है’ने ‘गोलमाल अगेन’ला केले ओव्हरटेक; ३०० कोटींचा आकडा केला पार!

googlenewsNext
१७ मध्ये ‘बाहुबली-२’नंतर जबरदस्त कमाई करणाºया ‘गोलमाल अगेन’ला बॉलिवूडचा दबंग सलमान खानच्या ‘टायगर जिंदा है’ चित्रपटाने ओव्हरटेक केले आहे. त्याचबरोबर या वर्षात सर्वाधिक कमाई करणाºया चित्रपटांमध्ये दुसरे स्थानही पटकाविले आहे. ‘गोलमाल अगेन’ने २०५.६७ कोटी रूपयांची कमाई केली होती, मात्र सलमानच्या ‘टायगर जिंदा है’ने आता या चित्रपटाला धोबीपछाड देत २०६.०४ कोटी रूपयांची कमाई केली आहे, तर वर्ल्डवाइज कलेक्शन लक्षात घेता या चित्रपटाने तीनशे कोटी रूपयांच्या क्लबमध्ये स्थान मिळविले आहे. 

या चित्रपटाने ओपनिंग डेला ३४.१० कोटी रूपयांची कमाई केली होती. त्यानंतर शनिवार (३५.३० कोटी), रविवार (४५.५३ कोटी), सोमवार (३६.५४ कोटी), मंगळवार (२१.६० कोटी), बुधवार (१७.५५) आणि गुरूवार (१५.४२) कोटी रूपयांची कमाई केली. एकूणच भारतात या चित्रपटाने आतापर्यंत २०६.०४ कोटी रूपयांची कमाई केली. याबाबतची संपूर्ण माहिती ट्रेड एनालिस्ट तरण आदर्श यांनी ट्विटच्या माध्यमातून दिली आहे. 



या चित्रपटाने तीनच दिवसांत शंभर कोटी रूपयांच्या क्लबमध्ये स्थान मिळविल्याने चित्रपट बॉक्स आॅफिसवर धूम करेल अशी शक्यता वर्तविली जात आहे. त्याचबरोबर दोनशे कोटी रूपयांचा गल्ला जमविण्यात चित्रपट यशस्वी होईल असेही बोलले जात आहे. त्यातच हा चित्रपट भारताबरोबरच विदेशातही जबरदस्त कमाई करीत असल्याने आणखी किती गल्ला जमविणार याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. चित्रपटाच्या विदेशातील कमाईचा विचार केल्यास सोमवारपर्यंत या चित्रपटाने ५४ कोटी रूपयांचा गल्ला जमविला होता. आता त्याच्यात वाढ झाली आहे. 

Web Title: BOX OFFICE: 'Tiger is alive' overtakes 'Golmaal again'; 300 crore mark crossing!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.