Boycott करण जोहर आणि सलमान खान फिल्म्स, सुशांतच्या चाहत्यांनी दाखल केली ऑनलाइन याचिका
By ऑनलाइन लोकमत | Published: June 17, 2020 12:54 PM2020-06-17T12:54:33+5:302020-06-17T12:55:27+5:30
सुशांत सिंग राजपूतच्या आत्महत्येनंतर बॉलिवूडमधील घराणेशाहीच्या विरोधात ऑनलाइन याचिका दाखल करण्यात आली आहे. या याचिकेला खूप चांगला प्रतिसाद मिळतो आहे.
सुशांत सिंग राजपूतने त्याच्या कामातून स्वतःला सिद्ध केले होते. त्यामुळे सुशांतने रसिकांमध्ये एक वेगळेच स्थान निर्माण केले होते. त्यामुळे त्याच्या अशा एक्झिटने साऱ्यांनाच प्रचंड धक्का बसला आहे. सुशांतने आत्महत्या का केली, यामागचे कारण अद्याप समोर आलेले नाही. मात्र त्यामागे त्याचे अफेयर आणि नेपोटिझम यासारखी बरीच कारणे सातत्याने चर्चेत येत आहेत. त्याने डिप्रेशनमध्ये हे टोकाचे पाऊल उचलल्याचं सांगितलं जाते आहे. मात्र त्यामागे काय कारण असेल, यावर सध्या वाद रंगलेला पहायला मिळतो आहे.
बॉलिवूडमधील मोठ्या मीडिया हाउसने सुशांत सिंग राजपूतने बॅन केले होते आणि त्यामुळे त्याने सुसाइड केल्याचे बोलले जात आहे. यात करण जोहरचा धर्मा प्रोडक्शन, यशराज फिल्म्स, सलमान खान आणि संजय लीला भन्साळी यांच्या प्रोडक्शन हाउसचे नाव समोर येत आहे. आता या बॉलिवूडमधील घराणेशाहीच्या विरोधात ऑनलाइन याचिका दाखल करण्यात असून त्यासाठी सह्यांची मोहिम राबवली जाते आहे. या याचिकेला खूप चांगला प्रतिसाद मिळतो आहे. आतापर्यंत एक मिलियनहून अधिक लोकांनी या याचिकेसाठी सही केली आहे.
सुशांत सिंग राजपूतने 14 जून रोजी वांद्रे येथील राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली आहे. त्याच्या घरात कोणतीही सुसाइड नोट सापडली नाही. तो गेल्या सहा महिन्यांपासून डिप्रेशनमध्ये होता आणि त्यावर उपचार घेत असल्याचे समोर आले. याप्रकरणी पोलीस तपास करत आहेत.
सुशांत शेवटचा छिछोरे चित्रपटात झळकला होता. या चित्रपटाला खूप चांगला रिस्पॉन्स मिळाला होता. आगामी त्याचा दिल बेचारा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार होता.