अक्षय कुमारच्या सिनेमाचा वाद थांबता थांबेना; ट्विटरवर पुन्हा ट्रेंड झाला #Ban_Laxmmi_Movie

By रूपाली मुधोळकर | Published: November 5, 2020 02:03 PM2020-11-05T14:03:21+5:302020-11-05T14:06:30+5:30

अभिनेता अक्षय कुमार व कियारा अडवाणी स्टारर ‘लक्ष्मी’ या सिनेमावरून सुरु झालेला वाद तूर्तास तरी थांबायची चिन्हे नाहीत.

#Boycott Laxmii Trends Again; Netizens Believe Akshay Kumar Movie Is Promoting Love Jihad | अक्षय कुमारच्या सिनेमाचा वाद थांबता थांबेना; ट्विटरवर पुन्हा ट्रेंड झाला #Ban_Laxmmi_Movie

अक्षय कुमारच्या सिनेमाचा वाद थांबता थांबेना; ट्विटरवर पुन्हा ट्रेंड झाला #Ban_Laxmmi_Movie

googlenewsNext
ठळक मुद्दे‘लक्ष्मी’या सिनेमात अक्षय कुमार मुख्य भूमिकेत आहे. तो यात आसिफ आणि लक्ष्मीची भूमिका साकारताना दिसेल.

अभिनेता अक्षय कुमार व कियारा अडवाणी स्टारर ‘लक्ष्मी’ या सिनेमावरून सुरु झालेला वाद तूर्तास तरी थांबायची चिन्हे नाहीत. आधी या सिनेमाच्या टायटलवरून वाद झाला. हा वाद विकोपाला जाण्याआधीच मेकर्सनी सिनेमाचे नाव बदलून ‘लक्ष्मी’असे नवे नामकरण केले. मात्र यानंतर या सिनेमाचे ‘बम भोले’ हे गाणे रिलीज झाले आणि या गाण्यावरून पुन्हा एकदा वादाला तोंड फुटले. नेटक-यांनी पुन्हा हा सिनेमा बॅन करण्याची मागणी लावून धरली. यानंतर ‘Ban_Laxmmi_Movie’ हा हॅशटॅग सोशल मीडियावर ट्रेंड झाला.

कालपरवाच ‘लक्ष्मी’चे ‘बम भोले’ हे गाणे रिलीज झाले. या गाण्यावर अनेक नेटक-यांनी आक्षेप नोंदवला. गाण्यात हिंदू देवीदेवतांचा अपमान झाल्याचा आरोप करत नेटक-यांनी केला. शिवाय चित्रपटाच्या टायटलबद्दलही संताप व्यक्त केला.

आधी अक्षयच्या या सिनेमाचे नाव ‘लक्ष्मी बॉम्ब’ होते. या टायटलला प्रचंड विरोध झाल्यानंतर मेकर्सनी ‘लक्ष्मी बॉम्ब’ हे टायटल बदलून ‘लक्ष्मी’ असे नवे टायटल दिले. पण या नव्या टायटलवरही नेटकरी समाधानी नाहीत. केवळ ‘बॉम्ब’ हटवले, मात्र ‘लक्ष्मी’ तसेच कायम ठेवले. सिनेमाच्या टायटलचा चित्रपटाच्या कथानकाशी काहीही संबंध नसताना हे नाव दिले गेले, हा हिंदूंच्या भावना दुखावण्याचा प्रकार आहे, असे नेटक-यांनी म्हटले आहे. आम्हाला ना ‘लक्ष्मी बॉम्ब’ नाव हवे, ना ‘लक्ष्मी’ अशी मागणी आता नेटक-यांनी केली आहे.

लव्ह जिहादला प्रोत्साहन देत असल्याचाही आरोप
काही दिवसांपूर्वीच ज्वेलरी ब्रॅन्ड तनिष्कच्या एका जाहिरातीवरून वादळ उठले होते. ही जाहिरात लव्ह जिहादला प्रोत्साहन देणार असल्याचा आरोप झाला होता. ‘लक्ष्मी’ या सिनेमावरही लव्ह जिहादला प्रोत्साहन देत असल्याचा आरोप झाला होता. अद्यापही लोक हाच आरोप करत आहेत. या सिनेमात अक्षय कुमारच्या भूमिकेचे नाव आसिफ  आहे. तर कियारा अडवाणीच्या भूमिकेचे नाव प्रिया आहे. 
‘लक्ष्मी’हा तमिळ सिनेमा ‘कंचना’चा हिंदी रिमेक आहे. ओरिजीनल सिनेमात हिरोच्या भूमिकेचे नाव राघव होते. मग याच्या हिंदी रिमेकमध्ये हे नाव आसिफ कसे झालेआणि हिरोईनच्या भूमिकेचे नाव प्रिया का ठेवलेगेलेअसा सवाल अनेकांनी उपस्थित केला होता.

‘लक्ष्मी’या सिनेमात अक्षय कुमार मुख्य भूमिकेत आहे. तो यात आसिफ आणि लक्ष्मीची भूमिका साकारताना दिसेल. अक्षयसोबतच या सिनेमात मुख्य भूमिकेत कियारा अडवाणी दिसणार आहे. हा हॉरर-कॉमेडी सिनेमा 9 नोव्हेंबर 2020 ला डिज्ने प्लस हॉटस्टारवर  रिलीज होणार आहे. 

VIDEO : 'लक्ष्मी'च्या नव्या गाण्यात अक्षय कुमारचा गजब अवतार, असा पहिल्यांदाच केला त्याने डान्स...

- तर तलवारी निघाल्या असत्या...! अक्षय कुमारच्या ‘लक्ष्मी बॉम्ब’वर संतापले मुकेश खन्ना


 

Web Title: #Boycott Laxmii Trends Again; Netizens Believe Akshay Kumar Movie Is Promoting Love Jihad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.