Vijay Deverakonda : तर मग आम्ही घरी बसायचं का? ‘#BoycottLiger’ ट्रेंड होताच संतापला विजय देवरकोंडा  

By ऑनलाइन लोकमत | Published: August 22, 2022 01:30 PM2022-08-22T13:30:55+5:302022-08-22T13:32:30+5:30

Vijay Deverakonda : एकीकडे विजय देवरकोंडाच्या चाहत्यांमध्ये ‘लाइगर’ या चित्रपटाबद्दल जबरदस्त क्रेझ पाहायला मिळतेय. दुसरीकडे काही लोकांनी सोशल मीडियावर ‘#BoycottLiger’ ट्रेंड सुरू केला आहे.

boycott liger trend on twitter Vijay Deverakonda hits back to trolls | Vijay Deverakonda : तर मग आम्ही घरी बसायचं का? ‘#BoycottLiger’ ट्रेंड होताच संतापला विजय देवरकोंडा  

Vijay Deverakonda : तर मग आम्ही घरी बसायचं का? ‘#BoycottLiger’ ट्रेंड होताच संतापला विजय देवरकोंडा  

googlenewsNext

विजय देवरकोंडा (Vijay Deverakonda ) व अनन्या पांडेचा (Ananya Panday) ‘लाइगर’ (Liger) हा सिनेमा रिलीजसाठी सज्ज आहे. पण रिलीजआधी या चित्रपटावर ‘बायकॉट’ नावाचं संकट ओढवलं आहे. होय, एकीकडे विजय देवरकोंडाच्या चाहत्यांमध्ये या चित्रपटाबद्दल जबरदस्त क्रेझ पाहायला मिळतेय. दुसरीकडे काही लोकांनी सोशल मीडियावर ‘#BoycottLiger’ ट्रेंड सुरू केला आहे. पण या ट्रेंडमुळे विजय देवरकोंडा चांगलाच भडकला आहे. होय, बॉयकॉट गँगला त्याने सडेतोड उत्तर दिलं आहे.
‘बायकॉट करायचं तर करा. आम्ही काय करू शकतो. आम्ही फक्त सिनेमे बनवणार. ज्यांना पाहायचा ते पाहतील, ज्यांना नाही पाहायचा ते टीव्ही वा फोनवर पाहतील,’ असं अलीकडे विजय देवरकोंडा रागारागात म्हणाला होता. त्याचा हा व्हिडीओ व्हायरल झाला आणि सोशल मीडियावर #BoycottLiger ट्रेंड करू लागला.

तर आम्ही काम करणं सोडून द्यायचं काय?
 एकीकडे बायकॉट मोहिमेला जोर चढला असताना दुसरीकडे विजय देवरकोंडाचा पारा चढला. एका इव्हेंटमध्ये त्याने आपल्या संतापाला वाट मोकळी करून दिली. ‘ नेमकी भानगड काय आहे, हे मला माहित नाही. त्यांना काय हवंय? माहित नाही. आम्ही आमच्या बाजूने अगदी योग्य आहोत. माझा जन्म हैदराबादेत झाला. चित्रपटाचे दिग्दर्शक पुरी सरांना जन्म नरसीपट्टनममध्ये झाला. मग काय आम्ही काम करायचं नाही का? आम्ही आमचे सिनेमे रिलीज करायचे नाही का? सगळं सोडून आम्ही घरी बसायचं का? ’,अशा शब्दांत त्याने आपला संताप बोलून दाखवला. 

‘प्रेक्षक आमच्यावर किती प्रेम करतात, हे तुम्ही बघत आहोत. मी माझ्यावर प्रेम करणाऱ्या याच प्रेक्षकांसाठी चित्रपट बनवतो. जोपर्यंत हे चाहते आपल्यासोबत आहेत, तोपर्यंत घाबरण्याची गरज नाही. आपण आपलं कर्म करतोय, मग कुणाची ऐकून घेण्याची गरज नाही. मला काहीही भीती नाही. आम्ही मनापासून सिनेमा बनवला. आम्ही कम्युटरसमोर बसून ट्विट करणाऱ्यांपैकी नाही. आम्ही त्यापैकी आहोत जे काहीही झालं तर सर्वांत पुढे उभे राहतात,’ असंही विजय देवरकोंडा म्हणाला.
‘लाइगर’ला ट्रोल करणाऱ्यांना विजय देवरकोंडानं सडेतोड उत्तर दिलं आहे. आता त्याच्या चित्रपटाला लोक किती प्रेम देतात, ते बघूच.

Web Title: boycott liger trend on twitter Vijay Deverakonda hits back to trolls

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.