'बॉयकॉटने माझे आयुष्य संपणार नाही, माझ्याकडे खूप काम आहे'; बॉयकॉट ट्रेंडवर अनुराग स्पष्टच बोलला...

By ऑनलाइन लोकमत | Published: August 22, 2022 07:36 PM2022-08-22T19:36:54+5:302022-08-22T19:44:50+5:30

'जेव्हा हा बॉयकॉट ट्रेंड नव्हता, तेव्हाही माझे चित्रपट थिएटरमध्ये लागत नव्हते. बॉयकॉटने मला काही फरक पडत नाही.'

Boycott will not end my life, I will go and work in another country; Anurag Kashyap | 'बॉयकॉटने माझे आयुष्य संपणार नाही, माझ्याकडे खूप काम आहे'; बॉयकॉट ट्रेंडवर अनुराग स्पष्टच बोलला...

'बॉयकॉटने माझे आयुष्य संपणार नाही, माझ्याकडे खूप काम आहे'; बॉयकॉट ट्रेंडवर अनुराग स्पष्टच बोलला...

googlenewsNext


मुंबई: चित्रपट दिग्दर्शक-निर्माता अनुराग कश्यप आपल्या बिंदास्त बोलण्यामुळे अनेकदा वादात अडकतो. त्याच्या आतापर्यंतच्या आयुष्यात अनेक वादात तो अडकला आहे. या वादामुळे अनेकदा त्याच्या चित्रपटांना फटका बसलाय. आता परत एकदा बॉयकॉट ट्रेंडवर केलेल्या वक्तव्यामुळे तो नेटकऱ्यांच्या निशाण्यावर आला आहे. इंडिया टीव्हीला दिलेल्या मुलाखतीत अनुरागने बॉलिवूड चित्रपटांविरोधात सुरू असलेल्या बॉयकॉट मोहिमेवर खुलेपणाने भाष्य केले. बॉयकॉटची संस्कृती ही सोशल मीडियाची संस्कृती आहे,' असं अनुराग म्हणाला. 

बॉयकॉटने माझे आयुष्य संपणार नाही 
बॉयकॉटवर अनुराग म्हणाला, 'हिंदी चित्रपटसृष्टीवर बहिष्कार टाकून हा उद्योग टिकणार नाही असे वाटते का. मिठाई खाऊ नका असे डॉक्टर सांगतात, मग मिठाई बनवणे बंद झाले? लोकांना मधुमेहाचा त्रास होत असेल तर मिठाई बनणे बंद झाले? कोणावर बहिष्कार टाकल्याने माझे आयुष्य संपणार नाही. माझ्याकडे खूप काम आहे, मी आयुष्यात कधीही बेरोजगार राहणार नाही.' 

मी कोणत्याही देशात जाईन आणि कमाई करेन
अनुराग पुढे म्हणाला की, 'मी शिकवायचो तेव्हा इतके पैसे मिळवायचो जे अनेक शिक्षकांना मिळत नाहीत. मी कोणत्याही देशात जाऊन काहीही शिकवू शकतो. मी या देशातही शिकवू शकतो. बहिष्कार टाकून माझे आयुष्य संपणार नाही. माझे चित्रपट चालले नाहीत, यात ते त्यांना आनंद मिळतो. उद्या चित्रपट Netflix वर येईल. तापसीच्या चित्रपटावर बहिष्कार टाकला पण तो नेटफ्लिक्सवर ट्रेंड झाला. माझ्या अनेक चित्रपटांवर बहिष्कार टाकण्यात आला आहे.' 

मी 10 वर्षे रस्त्यावर होतो, तेव्हा...
तो पुढे म्हणाला की, 'सोशल मीडियापासून मेनस्ट्रीम मीडियामीपर्यंत बॉयकॉट ट्रेंड सुरू आहे. मीडियामध्ये नकारात्मक क्लिकबेट जास्त चालतात. ज्यांना चित्रपट बघायचा आहे ते बघतील, ज्यांना बघायचा नाही ते बघणार नाहीत. मी सुरुवातीच्या काळात 10 वर्षे रस्त्यावर होतो, तेव्हा तुम्ही कुठे होता? माझ्या चित्रपटांवर बंदी घातली जायची तेव्हा कुठे होतात? माझे असे कोणते चित्रपट आहेत जे तुम्ही सिनेमागृहात पाहिले आहेत? तुम्ही ते डाउनलोड करूनच पाहिले आहेत. माझा तुमच्या आणि तुमचा माझ्या आयुष्यावर अधिकार नाही,'असंही अनुराग म्हणाला.

Web Title: Boycott will not end my life, I will go and work in another country; Anurag Kashyap

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.