सुशांतसाठी ‘न्याय’ मागणारी कंगना राणौत का होतेय ट्रोल? ट्विटरवर ट्रेंड झाला #Boycott_Kangana

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 24, 2020 12:31 IST2020-08-24T12:30:57+5:302020-08-24T12:31:44+5:30

सर्वांवर बिथरणा-या कंगनावर आता नेटकरी भडकले

#Boycott_Kangana trending in Twitter | सुशांतसाठी ‘न्याय’ मागणारी कंगना राणौत का होतेय ट्रोल? ट्विटरवर ट्रेंड झाला #Boycott_Kangana

सुशांतसाठी ‘न्याय’ मागणारी कंगना राणौत का होतेय ट्रोल? ट्विटरवर ट्रेंड झाला #Boycott_Kangana

ठळक मुद्दे#Boycott_Kangana हा हॅशटॅग ट्रेंड होताच ट्विटरवर अनेक मीम्सचाही पूर आला.

बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंग राजपूतच्या मृत्यूनंतर त्याला न्याय मिळावा म्हणून अभिनेत्री कंगना राणौतने सोशल मीडियावर जोरदार मोहिम सुरु केलीय. पण आता सुशांतच्या फॅमिली वकीलांनी कंगनाच्या या मोहिमेतील जणू हवाच काढून घेतलीय. सुशांतचे फॅमिली वकील विकास सिंग यांनी कंगनावर असा काही ‘वार’ केला की, ट्विटरवर ‘बायकॉट कंगना राणौत’ हा हॅशटॅग ट्रेंड करू लागला.

काय म्हणाले सुशांतचे फॅमिली वकील?
सुशांतचे फॅमिली वकील विकास सिंह यांनी अलीकडे कंगनावर निशाणा साधला. कंगना ना सुशांतची प्रतिनिधी आहे, ना मित्र. ती केवळ इंडस्ट्रीतील समस्या समोर आणतेय. होऊ शकते सुशांतला सुद्धा नेपोटिजमचा फटका बसला असेल. पण सध्या कंगना जे काही करतेय ते सुशांतसाठी नाही तर स्वत:साठी करतेय, असे विकास सिंह म्हणाले.

ट्विटरवर ट्रेंड झाला #Boycott_Kangana

सुशांतच्या फॅमिली वकीलांच्या या वक्तव्यानंतर ट्विटरवर अचानक #Boycott_Kangana हा हॅगटॅग ट्रेंड होऊ लागला. अनेक युजर्सनी कंगना राणौतवर बहिष्कार घालण्याची मागणी केली. ‘दुस-याच्या मृत्यूचे भांडवल करून स्वत:चा अजेंडा चालवल्याबद्दल तुला लाज वाटायला हवी. अशी संधीसाधू मी बघितली नाही,’असे एका युजरने लिहिले.

अनेकांनी सुशांतच्या फॅमिली वकीलांनी केलेल्या वक्तव्याचा आधार घेत, कंगनाला ट्रोल केले. कंगनाही दुटप्पी आहे आणि भाजपाच्या हातचे बाहुले आहे. अनावश्यक गोष्टींवर वाद निर्माण करण्याशिवाय ती काहीही करत नाही, हे आता लोकांच्याही लक्षात आले आहे, असे एका युजरने लिहिले.

मीम्सही व्हायरल
#Boycott_Kangana हा हॅशटॅग ट्रेंड होताच ट्विटरवर अनेक मीम्सचाही पूर आला. कंगनावरच्या या मीम्सनी  लोकांचे चांगलेच मनोरंजन केले.

Web Title: #Boycott_Kangana trending in Twitter

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.