ट्विटरवर ट्रेंड होतोय #BoycottShahRukhKhan; लोकांनी दिली ‘पठान’ फ्लॉप करण्याची धमकी

By ऑनलाइन लोकमत | Published: September 16, 2021 11:26 AM2021-09-16T11:26:23+5:302021-09-16T11:28:06+5:30

गुरुवारचा दिवस उजाडला आणि #BoycottShahRukhKhan हा  ट्रेंड ट्विटरवर गर्दी करू लागला....

#BoycottShahRukhKhan trending on twitter people says they will not watch pathan | ट्विटरवर ट्रेंड होतोय #BoycottShahRukhKhan; लोकांनी दिली ‘पठान’ फ्लॉप करण्याची धमकी

ट्विटरवर ट्रेंड होतोय #BoycottShahRukhKhan; लोकांनी दिली ‘पठान’ फ्लॉप करण्याची धमकी

googlenewsNext
ठळक मुद्दे ‘पठान’ या यशराज बॅनरच्या सिनेमात शाहरूखसोबत दीपिका पादुकोण व जॉन अब्राहम मुख्य भूमिकेत आहेत. चित्रपटाचे बहुतांश शूटींग पूर्ण झाले आहे.

आज गुरुवारचा दिवस उजाडला आणि  #BoycottShahRukhKhan हा  ट्रेंड ट्विटरवर गर्दी करू लागला. बॉलिवूडचा ‘किंगखान’ म्हणून ओळखल्या जाणा-या शाहरूख खानचे (Shah Rukh Khan)अनेक जुने व्हिडीओ, फोटो शेअर करण्यासोबतचं त्याच्या विरोधातील  ट्वीटचा जणू महापूर आला. शाहरूखवर बहिष्कार घालण्याची मागणी सुरू झाली. शाहरूख भारताचा शत्रू असल्याचा दावा करण्यात आला. अचानक शाहरूखविरोधात ट्विटरवर संतापाची लाट का उसळली? हे ठाऊक नाही. पण शाहरूखच्या विरोधात ट्विटरवरचे वातावरण एकदम पेटले.

नेटक-यांनी केलेल्या ट्विटमध्ये शाहरूखचा एक जुना फोटो व्हायरल होताना दिसतोय. यात शाहरूख पाकिस्तानचे पंतप्रधान इमरान खान यांच्यासोबत दिसतोय. हा फोटो तसा जुना आहे. यात शाहरूख व इमरान खान हसत हसत गप्पा करताना दिसत आहेत.  हा फोटो शेअर करत, अनेकांनी शाहरूखला फैलावर घेतलं. भारतात राहून शाहरूख पाकिस्तानचे कौतुक करतो, असा आरोप त्याच्यावर ठेवला गेला.

याशिवाय शाहरूखचा एक जुना व्हिडीओही ट्रेंडमध्ये आला. यात शाहरूख पाकिस्तानी क्रिकेटपटूंचे कौतुक करतोय. हा व्हिडीओ शेअर करत अनेकांनी शाहरूखविरोधातला राग व्यक्त केला.

‘पठान’ फ्लॉप करण्याची धमकी
शाहरूखविरोधातील या मोहिमेदरम्यान लोकांनी त्याचा ‘पठान’ हा आगामी सिनेमा फ्लॉप करण्याची धमकी दिली. आम्ही कोणत्याही परिस्थितीत पठान पाहणार नाही, असा या लोकांचा सूर आहे. ‘पठान’ या यशराज बॅनरच्या सिनेमात शाहरूखसोबत दीपिका पादुकोण व जॉन अब्राहम मुख्य भूमिकेत आहेत. चित्रपटाचे बहुतांश शूटींग पूर्ण झाले आहे.
 

Web Title: #BoycottShahRukhKhan trending on twitter people says they will not watch pathan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.