बॉयफ्रेंड टायगर श्रॉफसारखीच लाजाळू आहे दिशा पटानी; वाचा दिशाने काय म्हटले?
By ऑनलाइन लोकमत | Published: August 1, 2017 04:35 PM2017-08-01T16:35:41+5:302017-08-01T22:05:41+5:30
अभिनेता टायगर श्रॉफची कथित गर्लफ्रेंड दिशा पटानी हिच्या मते, ती खूपच लाजाळू आहे. त्यामुळेच तिला लाइमलाइटमध्ये येण्यासाठी खूप वेळ ...
अ िनेता टायगर श्रॉफची कथित गर्लफ्रेंड दिशा पटानी हिच्या मते, ती खूपच लाजाळू आहे. त्यामुळेच तिला लाइमलाइटमध्ये येण्यासाठी खूप वेळ लागला. दिशाने आयएएनएसला ई-मेलच्या माध्यमातून दिलेल्या मुलाखतीत म्हटले की, ‘मी खूपच लाजाळू आहे. त्यामुळेच लाइमलाइटमध्ये येण्यासाठी मला वेळ लागला. हा एक व्यवसायाचा भाग आहे. त्यामुळे माझी याविषयी काहीही तक्रार नाही. उलट मी स्वत:ला खूप भाग्यशाली समजते. शिवाय प्रेक्षकांचे लक्ष माझ्याकडे आकर्षित करण्यात मी यशस्वी होत असल्यानेही आनंदी आहे.
‘एम. एस. धोनी : द अनटोल्ड स्टोरी’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये डेब्यू करणाºया दिशाच्या मते प्रसिद्ध व्यक्ती होण्याचे जसे फायदे आहेत, तसेच तोटेही आहेत. याविषयी बोलताना दिशाने म्हटले की, ‘आमच्याबाबत सकारात्मक बाब अशी की आम्हाला खूप फिरायला मिळते. मात्र नकारात्मक बाब ही आहे की, ज्या ठिकाणी आम्ही शूटिंग करतो ते ठिकाण सोडून आम्हाला कुठेही जाता येत नाही. सध्या दिशा ‘ओनली’ ब्रॅण्डच्या आगामी आॅटम/विंटर २०१७ च्या कलेक्शनची शूटिंग करीत आहे. याविषयी दिशाने म्हटले की, फॅशन एक अभिव्यक्त होण्याचे माध्यम आहे. वेगवेगळ्या प्रकारची फॅशन आणि स्टाइल असते. यामध्ये तुम्ही कम्फर्ट व्यक्त करणे महत्त्वाचे आहे.
पटकथेनुसार जर तुला डी-ग्लॅमच्या (साधा लूक) भूमिका साकारायला मिळाल्या तर तुझा त्यास होकार असेल काय? असे जेव्हा दिशाला विचारण्यात आले तेव्हा तिने म्हटले की, ‘चित्रपटात माझी भूमिका कशी हे माझ्या दृष्टीने फारसे महत्त्वाचे नाही. ‘एम. एस. धोनी : द अनटोल्ड स्टोरी’ या चित्रपटात माझी भूमिका एका सामान्य आणि साध्या मुलीची आहे. ही भूमिका साकारताना मी खूपच कमी मेकअप केला आहे. त्यामुळे मला अशा स्वरूपाच्या भूमिका साकारण्यात काहीच अडचण येणार नाही’, असे मी समजते.
वास्तविक निर्मात्यांचीच अशी डिमांड होती की, मी भूमिका साकारताना अधिकाधिक डोळ्यांनी बोलावे, ‘लोफर’ या तेलगू चित्रपटातदेखील मी अशाच काहीशा भूमिकेत होती. त्यात मी फारसा मेकअप केला नव्हता. फॅशनबरोबर दिशाला डान्सचाही छंद आहे. मात्र गेल्या काही दिवसांपासून तिला या छंदापासून दूर राहावे लागत आहे. पायाला दुखापत झालेली असल्याने दिशाला काही दिवस डान्स न करण्याचा सल्ला देण्यात आला आहे.