महाभारतात 'अभिमन्यू' बनलेला 'छोटा अमिताभ' का गेला 'अज्ञातवासात'? आज करतोय कोट्यवधींची उलाढाल

By ऑनलाइन लोकमत | Published: March 4, 2023 10:40 AM2023-03-04T10:40:22+5:302023-03-04T10:49:52+5:30

कित्येक वर्षे त्याच्याविषयीची कुठलीच बातमी समोर आली नाही..

Br chora mahabharat abhimanyu aka mayur raj verma also known as junior amitabh know what he is doing now net worth | महाभारतात 'अभिमन्यू' बनलेला 'छोटा अमिताभ' का गेला 'अज्ञातवासात'? आज करतोय कोट्यवधींची उलाढाल

महाभारतात 'अभिमन्यू' बनलेला 'छोटा अमिताभ' का गेला 'अज्ञातवासात'? आज करतोय कोट्यवधींची उलाढाल

googlenewsNext

70's And 80's Child Artists: बॉलिवूडचे महानायक अमिताब बच्चन (Amitabh Bachchan) हे त्यांच्या शानदार अभिनयासाठी ओळखले जातात. त्यांनी इतक्या भूमिका गाजवल्या की, त्यांना महानायक म्हटलं जातं. ते आजही न थांबता इंडस्ट्रीत काम करत आहेत. आपल्या ५३ वर्षांच्या फिल्मी करिअरमध्ये आतापर्यंत १७५ पेक्षा जास्त सिनेमात काम केलं आहे. गेल्या ५ दशकांमध्ये त्यांनी बॉलिवूडच्या सर्वच कलाकारांसोबत काम केलं आहे. त्यासोबतच असेही काही कलाकार आहेत ज्यांनी त्यांच्या सिनेमात अमिताभ यांच्या बालपणीची भूमिका साकारली आहे. आज आम्ही तुम्हाला ७० आणि ८०च्या दशकातील त्या बालकलाकारांबाबत सांगणार आहोत ज्यांनी अमिताभ बच्चन यांच्या बालपणीच्या भूमिका साकारल्या होत्या. पण नंतर अचानक असं काही घडलं की हा कलाकार इंडस्ट्रीतूनच गायब झाला.

होय, आम्ही 'मुकद्दर का सिकंदर' या चित्रपटात अमिताभ यांच्या बालपणीची भूमिका साकारणाऱ्या मयूर राज वर्माबद्दल बोलत आहोत. मयूर यांनी बालकलाकार म्हणून अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. बहुतांश चित्रपटांमध्ये त्याने अमिताभ बच्चन यांच्या लहानपणीच्या भूमिका साकारल्या आहेत. ज्यामुळे त्याला आजही ‘यंग अमिताभ’ या नावाने ओळखले जाते. मयूर राज वर्मा यांनी ‘मुकद्दर का सिकंदर’ या चित्रपटातून आपल्या फिल्मी करिअरला सुरुवात केली. या चित्रपटाचा भारतीय चित्रपटसृष्टीच्या इतिहासात यशस्वी चित्रपट म्हणून उल्लेख केला जातो. कारण या चित्रपटाने त्यावेळी डायमंड जुबली सेलिब्रेट केली होती. याच चित्रपटामुळे मयूर राज वर्मा म्हणजेच ‘मास्टर मयूर’ रातोरात सुपरस्टार बनले होते. अमिताभ बच्चनची लहानपणीची भूमिका साकारून जेवढी प्रसिद्धी मयूर वर्मा यांना मिळविली तेवढी प्रसिद्धी आतापर्यंत एकाही बालकलाकाराला मिळाली नाही. 

सगळ्यात महागडे चाईल्ड आर्टिस्ट 
हळूहळू मयूर जबरदस्त लोकप्रिय होत गेले. त्यामुळे मयूर हे त्याकाळातील सर्वाधिक फीस घेणारे बालकलाकार होता. असे म्हटले जात आहे की, अमिताभच्या ‘अँग्री यंग मॅन’ची छबी बनविण्यात काही प्रमाणात मयूर यांचाही वाटा आहे. कारण मयूर ज्या तल्लीनतेने आणि गंभीरतेने लहानपणीचा अमिताभ पडद्यावर साकारायचा त्यात प्रेक्षकांना लहानपणी अमिताभ असाच असेल, असा भास झाल्याशिवाय राहत नसे. 

त्यांनी महाभारत अभिमन्युची भूमिका साकारली. अभिमन्यूच्या व्यक्तिरेखतही त्यांच्या दमदार अभिनयाने सर्वांची मनं जिंकली. रागाच्या भरात चक्रव्यूहला छेद देणारा 'अभिमन्यू'चा अभिनय पाहून प्रेक्षकांच्या अंगावर काटा उभा राहायचा,  मात्र एवढ्या मोठ्या शोमध्ये एवढी मोठी भूमिका साकारूनही मयूर यांना त्यानंतर कोणताही मोठा प्रोजेक्ट मिळाला नाही.

मात्र नंतरच्या काळात मयूर राज वर्मा बॉलिवूडमधून गायब झाला. कित्येक वर्षे त्याच्याविषयीची कुठलीच बातमी समोर आली नाही.. त्यानंतर मयूर राज वर्मा यांनी अभिनय सोडून व्यवसाय करण्यास सुरुवात केली. मयूर राज वर्मा आज वेल्स येथे वास्तव्यास असून, त्याला दोन मुले आहेत. मयूर वेल्स येथील प्रसिद्ध व्यावसायिक आहे. त्याठिकाणी तो पत्नीसोबत इंडियाना रेस्टॉरंटचा व्यवसाय करतो. त्याची पत्नी एक प्रसिद्ध शेफ आहे.

Web Title: Br chora mahabharat abhimanyu aka mayur raj verma also known as junior amitabh know what he is doing now net worth

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.