'ब्रह्मास्त्र' फेम दिग्दर्शक अयान मुखर्जीवर कोसळला दुःखाचा डोंगर, वडिलांचं झालं निधन
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 14, 2025 13:50 IST2025-03-14T13:49:03+5:302025-03-14T13:50:22+5:30
प्रसिद्ध दिग्दर्शक अयान मुखर्जी(Ayaan Mukherjee)चे वडील आणि अभिनेत्री काजोलचे काका देब मुखर्जी (Deb Mukherjee) यांचं निधन झाले. ते ८३ वर्षांचे होते.

'ब्रह्मास्त्र' फेम दिग्दर्शक अयान मुखर्जीवर कोसळला दुःखाचा डोंगर, वडिलांचं झालं निधन
प्रसिद्ध दिग्दर्शक अयान मुखर्जी(Ayaan Mukherjee)चे वडील आणि अभिनेत्री काजोलचे काका देब मुखर्जी (Deb Mukherjee) यांचं निधन झाले. ते ८३ वर्षांचे होते. गेल्या काही दिवसांपासून देब मुखर्जी आजारी होते आणि हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू होते. मात्र आज सकाळी त्यांची प्राणज्योत मालवली. देब मुखर्जी यांचं आज सकाळी त्यांच्या मुंबईतील घरी सकाळी ७.३०च्या दरम्यान निधन झाले. आज त्यांच्या पार्थिवावर संध्याकाळी ४ वाजता विलेपार्ले येथील पवनहंस स्मशानभूमीत अंत्यसंस्कार पार पडणार आहे.
देब मुखर्जी अनेक वर्षांपासून मुंबईतील सर्वात मोठा दुर्गा उत्सव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या 'नॉर्थ बॉम्बे सार्वजनिक दुर्गा पूजा पंडाल'चे आयोजन करत होते. त्यांच्यासोबत काजोल आणि राणी मुखर्जी या पूजेच्या आयोजनात त्यांना मदत करताना दिसल्या. मुंबईतील सर्वात मोठ्या दुर्गा उत्सवात दरवर्षी बॉलिवूडचे अनेक मोठे सेलिब्रिटी सहभागी होण्यासाठी येतात. देब मुखर्जी हे काजोलच्या खूप जवळ होते, देब मुखर्जी यांचे भाऊ जॉय मुखर्जी देखील अभिनेते होते आणि त्यांचा दुसरा भाऊ शोमू मुखर्जी यांचा विवाह अभिनेत्री काजोलची आई तनुजा यांच्याशी झाला होता. काजोल त्यांची मुलगी आहे. दुर्गापूजेदरम्यान डेबू अनेकदा काजोलची काळजी घेताना दिसले होते.
सिनेकारकीर्द
देब मुखर्जी ६० आणि ७०च्या दशकात अनेक चित्रपटांमध्ये दिसले, पण त्यांना फारसे यश मिळाले नाही. कराटे (१९८३), बातों बातों में (१९७९), मैं तुलसी तेरे आंगन की (१९७८), हैवान (१९७७), किंग अंकल (१९९३), बंधू (१९९२), आंसू बने अंगारे (१९९३), ममता की छांव में (१९८९) आणि गुरू हो जा शुरू (१९७९) या चित्रपटांमध्ये त्यांनी काम केले आहे.