Brahmastra Teaser : रणबीर-आलियाच्या 'ब्रह्मास्त्र'चा दमदार टीझर रिलीज, फॅन्स म्हणाले - सर्वांचे रेकॉर्ड तोडणार हा सिनेमा..
By ऑनलाइन लोकमत | Published: May 31, 2022 07:13 PM2022-05-31T19:13:31+5:302022-05-31T19:14:27+5:30
रणबीर कपूर (Ranbir Kapoor) आणि आलिया भट(Alia Bhatt)च्या बहुप्रतीक्षित 'ब्रह्मास्त्र'(Brahmastra)चा नवीन टीझर रिलीज झाला आहे.
रणबीर कपूर (Ranbir Kapoor) आणि आलिया भट(Alia Bhatt)च्या बहुप्रतीक्षित 'ब्रह्मास्त्र'(Brahmastra)चा नवीन टीझर रिलीज झाला आहे. रणबीर कपूर, आलिया भट्टसोबतच अमिताभ बच्चन, नागार्जुन आणि मौनी रॉय यांचाही लूक टीझरमध्ये समोर आला आहे. १५ जून रोजी 'ब्रह्मास्त्र'चा ट्रेलर लाँच करण्यात येणार असल्याचे घोषित करण्यात आले आहे.
या टीझरमध्ये रणबीर आणि आलिया आगीच्या ज्वालांमध्ये दिसत आहेत. या टीझरमध्ये या चित्रपटातील प्रत्येक पात्रांची झलक पाहायला मिळत आहे.हा एक अतिशय रोमांचक टीझर आहे. या चित्रपटाच्या टीझरमध्ये रणबीर आणि आलिया एकत्र दिसत आहेत. ब्रह्मास्त्रच्या या टीझर व्हिडिओमध्ये, लांब केस असलेला एक अनोळखी माणूस जादुई कोरीव काम करताना दिसत आहे. कोरीव कामात त्रिशूल (त्रिशूल) आणि इतर काही प्रतिमाही दिसतात. हातात त्रिशूळ घेऊन तो माणूस शर्टशिवाय उभा आहे. मात्र, टीझरमध्ये त्या व्यक्तीचा चेहरा दाखवण्यात आलेला नाही. पण, टीझर व्हिडिओमध्ये दिसणारी व्यक्ती दुसरी कोणी नसून शाहरुख असल्याचे चाहत्यांना वाटत आहे.
अनेक युजर्सनी टीझर व्हिडिओचा स्क्रीन शॉट शेअर करून हा शाहरुख खान असल्याचा दावा केला आहे. स्क्रीन शॉट शेअर करत नेटकरी म्हणतात की ते चित्रपटाचा फर्स्ट डे फर्स्ट शो पाहण्यासाठी जातील. ब्रह्मास्त्रच्या टीझरमध्ये शाहरुख खानला पाहिल्यानंतर अभिनेत्याचे चाहते खूप खुश झाले आहेत. वृत्तानुसार, रणबीर-आलिया स्टारर चित्रपटात शाहरुख खानचाही एक कॅमिओ असणार आहे. मात्र, अद्याप या वृत्ताला अद्याप दुजोरा मिळालेला नाही. तसेच या चित्रपटाचा टीझर पाहून नेटकरी हा चित्रपट सर्वांचे रेकॉर्ड तोडणार असे बोलत आहेत.
रणबीर कपूर, दिग्गज फिल्ममेकर एस. एस. राजामौली आणि दिग्दर्शक अयान मुखर्जी यांनी जवळपास १०० दिवस अगोदर 'ब्रह्मास्त्र भाग एक : शिवा'च्या बहुप्रतिक्षित ट्रेलरची तारीख जाहीर करून भारतातील आतुरतेनं वाट पाहणाऱ्या चाहत्यांना आश्चर्यचकीत केलं आहे. ९ सप्टेंबर २०२२ रोजी हिंदीसह तमिळ, तेलुगू, मल्याळम आणि कन्नड अशा एकूण पाच भाषांमध्ये हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. अमिताभ बच्चन, मौनी रॅाय आणि नागार्जुन अक्कीनेनी यांच्याही या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिका आहेत. तमिळ, तेलुगू, कन्नड आणि मल्याळम या दक्षिणात्य भाषांमध्ये 'ब्रह्मास्त्र'ची प्रस्तुती राजामौली करणार आहेत.