Brahmastra: ४ वर्षांपूर्वीच झाला होता 'ब्रह्मास्त्र'च्या कास्टचा भांडाफोड, आगामी भागात असणार हे कलाकार?
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 15, 2022 13:44 IST2022-09-15T13:43:48+5:302022-09-15T13:44:48+5:30
Brahmastra Movie: आजपासून बरोबर ३ वर्षे, ११ महिने, १७ दिवसांपूर्वी करण जोहरने एक अतिशय खास पोस्ट केली होती. त्यावेळी पुढे काय होणार याचा अंदाज कोणालाच लावता आला नाही.

Brahmastra: ४ वर्षांपूर्वीच झाला होता 'ब्रह्मास्त्र'च्या कास्टचा भांडाफोड, आगामी भागात असणार हे कलाकार?
आजपासून बरोबर ३ वर्षे, ११ महिने, १७ दिवसांपूर्वी करण जोहर(Karan Johar)ने एक अतिशय खास पोस्ट केली होती. त्यावेळी पुढे काय होणार याचा अंदाज कोणालाच लावता आला नाही. आता आलिया भट आणि रणबीर कपूरचा ब्रह्मास्त्र (Brahmastra) ९ सप्टेंबर रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला, तेव्हा पुन्हा एकदा सोशल मीडियावरील जुन्या पोस्ट समोर येऊ लागल्या. नेटकऱ्यांनी सुमारे चार वर्षांपूर्वीचा करण जोहरचा एक फोटो शोधून काढला आहे. आता प्रेक्षक स्वतः सांगत आहेत की करण जोहरने ब्रह्मास्त्रच्या स्टारकास्टबद्दल ४ वर्षापूर्वी इशारा दिला होता, परंतु तेव्हा कुणालाच अंदाज लावता आला नाही.
आलिया भट आणि रणबीर कपूर यांनी ब्रह्मास्त्रमध्ये पहिल्यांदाच लीड स्टार म्हणून एकत्र काम केले. या चित्रपटात काही युजर्सनी दावा केला आहे की त्यांनी रणवीर सिंग आणि दीपिका पादुकोण यांनाही पाहिले आहे. आता रणवीर सिंग आणि दीपिका पदुकोणची जोडी ब्रह्मास्त्र पार्ट २ देवामध्ये दिसणार असल्याचे प्रेक्षकांना वाटत आहे. बरं, सध्या, निर्मात्यांनी याबद्दल कोणतेही अधिकृत विधान शेअर केलेले नाही, परंतु चाहत्यांनी या दाव्यांवर करण जोहरची चार वर्षे जुनी पोस्ट शोधून काढली आहे. या उत्खननात त्यांना आमिर खानही सापडला आहे आणि आता त्यांना वाटतंय की आमिरही नव्या सिक्वेलचा (ब्रह्मास्त्र चित्रपट) भाग होऊ शकतो.
ब्रह्मास्त्र रिलीज झाल्यानंतर करण जोहरची २०१८ सालची पोस्ट व्हायरल झाली आहे. या पोस्टमध्ये करण जोहरने कॅप्शनमध्ये लिहिले की, आतापर्यंतचा सर्वात मोठा ब्लॉकबस्टर. या फोटोमध्ये करण जोहरसोबत शाहरुख खान, आलिया भट, आमिर खान, रणवीर सिंग, रणबीर कपूर आणि करण जोहर दिसत आहेत.
दिग्दर्शक अयान मुखर्जी ब्रह्मास्त्र तीन भागात आणणार आहे. हा एक ट्रिलॉजी चित्रपट आहे, ज्याचा दुसरा भाग २०२५ पर्यंत आणला जाणार आहे. आता हा फोटो पाहून आता चाहत्यांचे म्हणणे आहे की, ब्रह्मास्त्रच्या तिन्ही भागांची स्टारकास्ट दाखवणारा हा फोटो आहे.