मलायकासोबत ब्रेकअप, या घटस्फोटीत अभिनेत्रीच्या प्रेमात अर्जुन?, यावर ती म्हणाली...

By ऑनलाइन लोकमत | Published: August 25, 2023 10:36 AM2023-08-25T10:36:39+5:302023-08-25T10:36:57+5:30

Malaika Arora And Arjun Kapoor : मलायका आणि अर्जुन वेगळे झाले असून अभिनेता दुसऱ्या घटस्फोटीत अभिनेत्रीच्या प्रेमात असल्याची चर्चा सध्या सगळीकडे सुरू आहे.

Breaking up with Malaika, Arjun in love with this divorced actress?, she said... | मलायकासोबत ब्रेकअप, या घटस्फोटीत अभिनेत्रीच्या प्रेमात अर्जुन?, यावर ती म्हणाली...

मलायकासोबत ब्रेकअप, या घटस्फोटीत अभिनेत्रीच्या प्रेमात अर्जुन?, यावर ती म्हणाली...

googlenewsNext

बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोरा (Malaika Arora) सध्या प्रोफेशनल लाइफपेक्षा जास्त खासगी आयुष्यामुळे चर्चेत असते. अभिनेत्री अर्जुन कपूर(Arjun Kapoor)सोबतच्या नात्यामुळे मलायका सातत्याने चर्चेत येत असते. गेल्या काही दिवसांपूर्वी असे वृत्त समोर आले होते की, मलायका आणि अर्जुनचं ब्रेकअप झाले आहे. दोघांच्या नात्याबाबतच्या या अफवेने सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. मलायका आणि अर्जुन वेगळे झाले असून अभिनेता दुसऱ्या घटस्फोटीत अभिनेत्रीच्या प्रेमात असल्याची चर्चा सध्या सगळीकडे सुरू आहे.

दोघांची गणना बी-टाऊनच्या लोकप्रिय जोडप्यांमध्ये केली जाते. त्याचबरोबर मलायका आणि अर्जुनकडून ब्रेकअपच्या वृत्तावर कोणतीही प्रतिक्रिया समोर आलेली नाही. मलायका आणि अर्जुनच्या ब्रेकअपची चर्चा तेव्हा सुरू झाली जेव्हा अर्जुन कपूरने त्याच्या इंस्टाग्राम हँडलवर सोलो व्हेकेशनचा फोटो शेअर केला. यादरम्यान त्याने एक पोस्ट लिहिली. त्याने लिहिले की, 'आयुष्य लहान आहे. तुमचा विकेंड लांब करा. मात्र, ब्रेकअपच्या वृत्तावर अर्जुन आणि मलायकाने अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.

अर्जुन कपूर करतोय कुशा कपिलाला डेट?
याशिवाय अर्जुन कपूरचे नाव सोशल मीडियावरील प्रसिद्ध इन्फ्लुयन्सर आणि अभिनेत्री कुशा कपिलासोबतही जोडले जात आहे. त्याचवेळी, आता अभिनेत्रीने या चर्चांवर तिची प्रतिक्रिया दिली आहे. अर्जुन कपूरला डेट करत असल्याच्या वृत्तांवर टिप्पणी करताना ती म्हणाली, 'माझ्याबद्दल इतकं बकवास रोज वाचल्यानंतर, मला स्वतःचा एक फॉर्मेट परिचय करून द्यावा लागेल. मी नेहमीच माझ्याबद्दल मूर्ख गोष्टी पाहते. मी फक्त प्रार्थना करतो की माझ्या आईने हे सर्व वाचू नये. तिच्या सोशल लाइफला धक्का बसेल.
अर्जुन कपूर आणि कुशा कपिला यापूर्वी दिग्दर्शक करण जोहरच्या घरी एकत्र दिसले होते, जिथे मलायका अरोरा त्याच्यासोबत दिसली नव्हती. पार्टीचा एक फोटो व्हायरल झाला होता, ज्यामध्ये प्रत्येकजण कॅमेऱ्यासाठी पोज देताना दिसत होता. त्यानंतरच त्यांच्या अफेअरच्या चर्चांना उधाण आले.

Web Title: Breaking up with Malaika, Arjun in love with this divorced actress?, she said...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.