‘अंग्रेजों के जमाने के जेलर’ असरानी

By ऑनलाइन लोकमत | Published: January 1, 2017 05:50 PM2017-01-01T17:50:58+5:302017-01-01T17:50:58+5:30

‘अंग्रेजों के जमाने के जेलर’ अर्थात असरानी यांचा १ जानेवारी रोजी वाढदिवस.  गोवर्धन असरानी यांनी गेल्या ५० वर्षात सुमारे ...

'British jailer jailer' Asrani | ‘अंग्रेजों के जमाने के जेलर’ असरानी

‘अंग्रेजों के जमाने के जेलर’ असरानी

googlenewsNext
ंग्रेजों के जमाने के जेलर’ अर्थात असरानी यांचा १ जानेवारी रोजी वाढदिवस.  गोवर्धन असरानी यांनी गेल्या ५० वर्षात सुमारे हिंदी, गुजराती, पंजाबी अशा ३५० हून अधिक चित्रपटात काम केले. विनोदी अभिनेता म्हणून त्यांची कारकीर्द गाजली. वाढदिवसानिमित्त त्यांच्या फिल्मी कारकीर्दीवर टाकलेली एक नजर.
१ जानेवारी १९४१ रोजी जयपूर येथे असरानी यांचा जन्म झाला. ते सिंधी परिवारातील आहेत. त्यांचे वडील फाळणीनंतर जयपूर येथे स्थलांतरीत झाले. असरानी यांना चार बहिणी आणि तीन भाऊ होत.
त्यांचे शिक्षण सेंट झेव्हिअर्स स्कूल आणि राजस्थान कॉलेज, जयपूर येथे झाले. आपल्या शिक्षणाचा खर्च त्यांनी जयपूर आकाशवाणी येथे कार्यक्रम करीत पूर्ण केला.



आज की ताजा खबर आणि तपस्या या चित्रपटादरम्यान त्यांची मंजू यांच्याशी भेट झाली. दोघेही प्रेमात पडले. पुढे त्याचे लग्नात रुपांतर झाले. १९६० ते १९६२ दरम्यान साहित्य कालभाई यांच्याकडून त्यांनी अभिनयाचे धडे गिरविले. १९६३ साली त्यांना हृषिकेश मुखर्जी आणि किशोर साहू यांनी व्यावसायिक अभिनय करण्याची सूचना केली.
१९६४ साली ते पुण्याच्या फिल्म इन्स्टिट्यूटमध्ये शिक्षणासाठी आले. १९६७ साली हरे काँच की चुडिया या चित्रपटात त्यांना पहिला ब्रेक मिळाला. यावेळी त्यांनी गुजराती चित्रपटातही काम केले.



१९६९ साली त्यांनी हृषिकेश मुखर्जी यांच्या सत्यकाम मध्ये सहअभिनेत्याची भूमिका निभावली. मेरे अपने चित्रपटातील त्यांच्या कामाची चर्चा झाली. १९७१ ते १९७४ या दरम्यान त्यांना विविध भूमिका साकारता आल्या. यात विनोदी भूमिकांचाही समावेश होता.
बावरची चित्रपटाच्या सेटवर त्यांची त्यावेळचा सुपरस्टार राजेश खन्ना याच्याशी ओळख झाली. पुढे राजेश खन्ना यांच्या ओळखीने त्यांना अनेक चित्रपटात काम करता आले. १९७२ ते १९९१ या प्रदीर्घ काळात त्यांनी राजेश खन्ना यांच्यासोबत काम केले.



या काळात मेरे अपने, कोशिश, बावरची, अभिमान, पलकों की छांव मे, महेबुबा, दो लडके दोनो कडके आणि बंदीश सारख्या चित्रपटांमधून काम केले. आज की ताजा खबर, रोटी, प्रेम नगर, चुपके चुपके, छोटी सी बात, रफू चक्कर, शोले, बालिका वधू, फकीरा, अनुरोध, चरस, फांसी, दिल्लगी, हिरालाल पन्नालाल, पती पत्नी और वो, हमारे तुम्हारे या चित्रपटांमधून विनोदी भूमिका केल्या. १९७४ साली आज की ताजा खबर आणि १९७७ साली बालिका वधू या चित्रपटासाठी त्यांना फिल्मफेअर अ‍ॅवॉर्डस् मिळाले.
शोले चित्रपटातील ‘अंग्रेजों के जमाने के जेलर’ ही भूमिका आणि चुपके चुपके मधील प्रशांत किशोर श्रीवास्तव ही भूमिका खूप गाजली. ७०आणि ८० च्या दशकातील कॉमेडियन म्हणून त्यांचे नाव गाजले. 



याशिवाय त्यांनी काही गंभीर प्रकारच्या भूमिकाही निभावल्या. हमारी बहु अलका, एक ही भूल, ये कैसा इन्साफ, कामचोर, अगर तुम ना होते, आशा ज्योती, मकसद, मैं इंतकाम लुंगा, लव्ह ८६, बिवी हो तो ऐसी या चित्रपटातील त्यांच्या भूमिका गाजल्या.
१९९० नंतर त्यांनी पुन्हा हिंदी चित्रपटात काम केले. जो जिता वोही सिकंदर, गर्दीश, तकदीरवाला, घरवाली बाहरवाली, बडे मियाँ छोटे मियाँ, हिरो हिंदुस्थानी, हेरा फेरी, चुपके चुपके, हलचल, बोल बच्चन, दे दनादन, भागमभाग या चित्रपटातही काम केले. उडान, सलाम मेम साब, चला मुरारी हिरो बनने या चित्रपटाचे दिग्दर्शन केले. कोशिश आणि तेरी मेहरबानी या चित्रपटात त्यांनी गाणेही म्हटले आहे. 



असरानी हे काम प्रसिद्धी माध्यमांपासून दूर राहिले. २००४ साली लोकसभा निवडणुकीत ते काँग्रेसकडून उभे राहिले होते. मात्र ते राजकारणात अधिक काळ राहिले नाहीत. 



Web Title: 'British jailer jailer' Asrani

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.