क्रितीचे ‘आ बैल मुझे मार’!!
By ऑनलाइन लोकमत | Published: August 30, 2016 12:34 PM2016-08-30T12:34:00+5:302016-08-30T18:04:00+5:30
क्रिती सॅननची गत सध्या ‘आ बैल मुझे मार’ सारखी झाली आहे. होय, अलीकडे क्रितीच्या लिंकअपच्या बातम्या बºयाच गाजल्या. इतक्या ...
क रिती सॅननची गत सध्या ‘आ बैल मुझे मार’ सारखी झाली आहे. होय, अलीकडे क्रितीच्या लिंकअपच्या बातम्या बºयाच गाजल्या. इतक्या की,खुद्द क्रितीला उठता-बसता याच बातम्या आठवू लागल्या आहेत. याचा परिणाम म्हणजे, मीडियाने न विचारताच क्रिती याबाबतच्या प्रश्नांना उत्तरे देऊ लागली आहे. ‘राबता’च्या शूटींगदरम्यान सुशांत सिंह राजपूत आणि क्रिती यांच्या अफेअरची जोरदार चर्चा झाली. या चर्चेमुळे काहीशी वैतागलेली क्रिती अलीकडे मीडियाला सामोरी गेली आणि आश्चर्य म्हणजे, मीडियाने न विचारताच तिच्या व सुशांतच्या अफेअरबद्दल बोलू लागली. मीडियावर तिने चांगलीच भडास काढली. ‘ मी बºयाच दिवसांपासून गायब होती. पण तुम्ही मीडियावाल्यांनी ती मला दोन-तिनदा हॉलीडेवर पाठवून दिले. पण मी कुणासोबत सुट्टी घालवत नव्हते तर शूटींगमध्ये बिझी होते. नुकतेच शूटींगचे दोन मोठे शेड्यूल मी संपवले...’, असे क्रिती म्हणाली. आता मीडियाने न विचारताच क्रिती लिंकअपबाबतच्या चर्चेवर खुलासे करू लागल्यावर काय म्हणणार? शेवटी हे ‘आ बैल मुझे मार’ असेच झाले ना??