भीषण आगीत ‘केसरी’चा सेट जळून खाक; लाखोंचे झाले नुकसान!

By ऑनलाइन लोकमत | Published: April 24, 2018 04:17 PM2018-04-24T16:17:40+5:302018-04-25T16:35:39+5:30

‘पॅडमॅन’सारखा सुपरहिट चित्रपट दिल्यानंतर अभिनेता अक्षयकुमार त्याच्या आगामी ‘केसरी’ या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. काही दिवसांपूर्वीच त्याने सेटवरील काही ...

Burning set of 'Kesari' in the fierce fire; Lakhs of losses! | भीषण आगीत ‘केसरी’चा सेट जळून खाक; लाखोंचे झाले नुकसान!

भीषण आगीत ‘केसरी’चा सेट जळून खाक; लाखोंचे झाले नुकसान!

googlenewsNext
ॅडमॅन’सारखा सुपरहिट चित्रपट दिल्यानंतर अभिनेता अक्षयकुमार त्याच्या आगामी ‘केसरी’ या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. काही दिवसांपूर्वीच त्याने सेटवरील काही फोटोज् शेअर करून चाहत्यांना ‘केसरी’च्या शूटिंगबद्दल माहिती दिली होती. दरम्यान, आमच्याकडे चित्रपटाशी संबंधित एक धक्कादायक माहिती आली असून, त्यानुसार ‘केसरी’ची शूटिंग थांबविण्यात आली आहे. होय, ‘केसरी’च्या सेटला भीषण आग लागली असून, त्यामध्ये ‘केसरी’चा सेट जळून खाक झाला आहे. मात्र यामध्ये कुठलीही विपरित घटना घडली नसल्याने समाधान व्यक्त केले जात आहे. 



सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘चित्रपटाचा एक सीन शूट केला जात होता. ज्यामध्ये फटाके फोडायचे होते. या सीनदरम्यान चूक झाली आणि काही क्षणांतच सेटला भीषण आग लागली. जेव्हा सेटला आग लागली होती, तेव्हा अक्षयकुमार सेटवर नव्हता. कारण अक्षय त्याच्या सीनची शूटिंग पूर्ण करून लोकेशनवरून निघाला होता. असे सांगितले जात आहे की, ज्या लोकेशनवर ‘केसरी’ची शूटिंग सुरू होती, त्याठिकाणी आणखी दहा दिवस शूटिंग केली जाणार होती. परंतु तत्पूर्वीच सेट जळून खाक झाला. 



दरम्यान, या दुर्घटनेत कुठलीही जीवितहानी झाली नसल्याने समाधान व्यक्त केले जात आहे, तर प्रॉडक्शन हाउस या घटनेमुळे चांगलेच बिथरले आहे. कारण आगीमुळे संपूर्ण सेट जळाल्याने लाखो रूपयांचे नुकसान झाले आहे. त्याचबरोबर पुढील दहा दिवसांचे शूटिंगही थांबवावे लागले आहे. त्यातच ‘केसरी’ एक पीरियड चित्रपट असल्याने सेट पुन्हा उभा करणे ही सोपी बाब नसल्याने प्रॉड््क्शन हाउसला याचा मनस्ताप सहन करावा लागणार आहे. असे म्हटले जात आहे की, सेट पुन्हा उभा करण्यासाठी बराच काळ लागण्याची शक्यता आहे. शिवाय यासाठी खर्चही भरपूर लागणार आहे. ‘केसरी’ पुढच्या वर्षी होळीनिमित्त प्रदर्शित केला जाणार आहे. चित्रपटात अक्षयकुमार आणि परिणिती चोपडा यांच्या मुख्य भूमिका आहेत. 

Web Title: Burning set of 'Kesari' in the fierce fire; Lakhs of losses!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.