महिनाभरापासून ‘तो’ करत होता एकता कपूरचा पाठलाग! कारण ऐकून पोलिसही हैराण!!

By ऑनलाइन लोकमत | Published: March 20, 2019 12:31 PM2019-03-20T12:31:40+5:302019-03-20T12:31:54+5:30

टीव्ही इंडस्ट्रीची दिग्गज निर्माती एकता कपूरचा पाठलाग करणा-या एका ३२ वर्षांच्या व्यक्तिला पोलिसांनी अटक केली आहे. हा आरोपी गेल्या महिनाभरापासून एकताचा पाठलाग करत होता.

cab driver arrested for stalking ekta kapoor over 30 times | महिनाभरापासून ‘तो’ करत होता एकता कपूरचा पाठलाग! कारण ऐकून पोलिसही हैराण!!

महिनाभरापासून ‘तो’ करत होता एकता कपूरचा पाठलाग! कारण ऐकून पोलिसही हैराण!!

googlenewsNext
ठळक मुद्देएकता ज्या जिममध्ये जायची, सुधीरने त्याच जिमची मेंबरशिप मिळवली. गत शनिवारी एकता कपूर जिममध्ये वर्कआऊट करायला पोहोचली असता, सुधीरने तिथेही तिचा पाठलाग केला.

टीव्ही इंडस्ट्रीची दिग्गज निर्माती एकता कपूरचा पाठलाग करणा-या एका ३२ वर्षांच्या व्यक्तिला पोलिसांनी अटक केली आहे. हा आरोपी गेल्या महिनाभरापासून एकताचा पाठलाग करत होता. सुधीर राजेंद्र सिंह असे या आरोपीचे नाव आहे. तो हरियाणाचा रहिवासी असल्याचे कळते. गेल्या काही दिवसांपासून एकता जिथे जाईल तिथे सुधीर तिचा पाठलाग करायचा. आधी एकताने त्याच्याकडे दुर्लक्ष केले. पण काही दिवसांपूर्वी एकता जुहूच्या एका मंदिरात दर्शनासाठी गेली असता आरोपी तिथेही पोहोचला. केवळ इतकेच नाही तर त्याने एकताला भेटायचा प्रयत्न केला. एकताच्या सुरक्षा रक्षकांनी त्याला पकडले आणि पुन्हा असे न करण्याचे बजावले. पण आरोपी बधला नाही. 


एकता ज्या जिममध्ये जायची, सुधीरने त्याच जिमची मेंबरशिप मिळवली. गत शनिवारी एकता कपूर जिममध्ये वर्कआऊट करायला पोहोचली असता, सुधीरने तिथेही तिचा पाठलाग केला. साहजिकच एकता घाबरली आणि तिने पोलिसांना याबाबतची सूचना दिली. एकताच्या तक्रारीची दखल घेत,पोलिसांनी लगेच सीसीटीव्ही फुटेज व काही तांत्रिक पुराव्यांच्या आधारावर अंधेरी वेस्ट वीरा देसाई मार्गावरून आरोपीस अटक केली. पोलिसांनी केलेल्या चौकशीत आरोपीने जे काही सांगितले ते ऐकून पोलिसही हैराण झालेत. नोकरी मिळवण्यासाठी मी एकताचा पाठलाग करत असल्याचे त्याने पोलिसांना सांगितले. 


सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी सुधीर एक कॅब ड्राईव्हर आहे. महिनाभरात संपूर्ण शहरात त्याने एकताला फॉलो केले. एकताबद्दल त्याला इतकी माहिती कुठून मिळाली, याचा पोलिस तूर्तास शोध घेत आहेत.

Web Title: cab driver arrested for stalking ekta kapoor over 30 times

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.