बॉलिवूडच्या ‘या’ स्टार अभिनेत्याला तुम्ही ओळखू शकता काय?
By ऑनलाइन लोकमत | Published: June 7, 2017 03:33 PM2017-06-07T15:33:11+5:302017-06-07T21:03:11+5:30
कलाकारांचे पडद्यावरील आणि पडद्याबाहेरील जग अगदीच वेगळे असते. कारण जेव्हा कलाकारांना कॅमेºयाला सामोरे जावे लागते तेव्हा हेवी मेकअप करून ...
क ाकारांचे पडद्यावरील आणि पडद्याबाहेरील जग अगदीच वेगळे असते. कारण जेव्हा कलाकारांना कॅमेºयाला सामोरे जावे लागते तेव्हा हेवी मेकअप करून त्यांना स्क्रिन शेअर करावी लागते. मात्र जेव्हा ते खासगी आयुष्य जगत असतात तेव्हा अगदीच सर्वसामान्यांप्रमाणे त्यांचा वावर असतो. खरं तर बॉलिवूडमधील बरेचसे असे कलाकार आहेत ज्यांना नटून-थटून राहणे अजिबातच आवडत नाही. याच विचाराचा एक कलाकार साध्या कपड्यांवर तेही अगदी रिलॅक्स मूडमध्ये घराबाहेर पडला. मग काय, अनेकांना तो आपला फेव्हरेट असलेला हाच कलाकार आहे काय? असा प्रश्न पडला. काहींनी तर तो असूच शकत नाही, असा दावा केला. तर काही मात्र हा तोच कलाकार आहे, असा अजूनही विचार करीत आहेत. तुम्हीही तो कलाकार कोण हे ओळखण्याचा प्रयत्न करण्यास हरकत नाही. कदाचित काहींना लक्षात येईल, मात्र ज्यांना त्याला ओळखणे अवघड होईल त्यांनी खाली दिलेली माहिती आवर्जून वाचावी.
तर कदाचित वरील फोटो बघून तुम्हाला त्या कलाकाराला ओळखणे शक्य झाले असेल. होय, तुम्ही जो विचार करता तो तोच कलाकार आहे. पतौडी परिवारातील हा कलाकार म्हणजे नवाब सैफ अली खान होय. फोटोमध्ये तुम्ही बघू शकता की सैफने ग्रे कलरचे टी-शर्ट घातलेला असून, राखी आणि हाफ ट्रेकमध्ये तो दिसत आहे. डोळ्यावर चष्मा आणि मिशामुळे त्याचा लुक चांगलाच दमदार दिसत आहे. वास्तविक सैफला नेहमीच आपल्या स्टारडम लुकमध्ये आवडणे फारसे आवडत नाही. जेव्हा तो घरी किंवा फॅमिलीसोबत वेळ देतो तेव्हा तो अगदीच साध्या वेशभूषेत वावरत असतो. शिवाय तो याकाळात मेकअपलाही प्रचंड विरोध करीत असतो. अशा साध्या वेशभूषेत त्याला बºयाचदा बघण्यातही आले आहे. त्याचबरोबर सैफविषयी आणखी एक महत्त्वाची बाब म्हणजे त्याला इव्हेंट्स किंवा पार्टीमध्ये जाणे अजिबातच आवडत नाही.
वास्तविक सैफ आणि त्याची फॅमिली सध्या इंडस्ट्रीमध्ये सर्वाधिक चर्चेत आहे. सैफची पत्नी करिना कपूर जीम तसेच योगा क्लासला जाताना नेहमीच स्पॉट होत असते. शिवाय त्यांचा छोटा नवाब तैमूरही सध्या प्रचंड चर्चेत आहे. असो, आता सैफची प्रोफेशनल लाइफविषयी बोलायचे झाल्यास त्याच्या आगामी ‘बाजार’ या चित्रपटाचे पोस्टर नुकतेच रिलीज करण्यात आले आहेत. हा चित्रपट डिसेंबरमध्ये रिलीज होणार आहे. ‘बाजार’ व्यतिरिक्त तो ‘शेफ’मध्येही बघावयास मिळणार आहे. हा चित्रपट याच महिन्यात रिलीज होणार आहे. तसेच सप्टेंबर महिन्यात त्याचा ‘कालाकांदी’ हा चित्रपटही रिलीज होणार आहे. सैफचा अखेरचा चित्रपट ‘रंगून’ २४ फेब्रुवारी रोजी रिलीज झाला होता. या वर्षात त्याचे तब्बल चार चित्रपट रिलीज होणार आहेत.