स्मोकिंगमुळे कोणाला झाला कॅन्सर, तर कोणाला आला हृदयविकाराचा झटका, वाचा या स्टार्सच्या व्यसनाची कथा!
By ऑनलाइन लोकमत | Published: June 1, 2018 11:36 AM2018-06-01T11:36:58+5:302018-06-01T17:33:46+5:30
स्टार्सचे चाहत्यांकडून नेहमीच अनुकरण केले जाते. हेअरस्टाइल, कपडे, गॉगल, शूज, बोलण्याची-चालण्याची लकब चाहत्यांच्या अंगी अशी काही भिनते की, त्यांच्या ...
स्टार्सचे चाहत्यांकडून नेहमीच अनुकरण केले जाते. हेअरस्टाइल, कपडे, गॉगल, शूज, बोलण्याची-चालण्याची लकब चाहत्यांच्या अंगी अशी काही भिनते की, त्यांच्या कृतीतही ती स्पष्टपणे दिसून येते. त्यातच चांगल्या सवयींपेक्षा वाइट सवयी लवकर आत्मसात करण्याची मानवी प्रवृत्ती असल्याने त्याचाही परिणाम लगेच जाणवतो. त्यामुळे एखादा स्टार जर पडद्यावर सिगारेट पितांना दिसला तर तरुणांमध्ये त्याचे अनुकरण करण्याचा जणू काही ट्रेंडच बनतो. हीच बाब लक्षात घेऊन बºयाचशा स्टार्सनी धूम्रपानापासून चार हात लांब राहण्याचा संकल्प करीत हेल्दी लाइफस्टाइल अवलंबविली आहे. नुकत्याच साजरा करण्यात आलेल्या जागतिक तंबाखूविरोधी दिनानिमित्त याच अनुषंगाने घेतलेला हा आढावा...
रणबीर कपूर
अभिनेता रणबीर कपूर याला तर महाविद्यालयीन जीवनापासून सिगारेटचे व्यसन होते. इंडस्ट्रीत आल्यानंतर तो मद्यपानही करू लागला. मात्र आई नितू कपूरच्या सांगण्यावरून त्याने व्यसनापासून चार हात लांब राहणे पसंत केले आहे. सध्या रणबीर प्रचंड हेल्थ कॉँशियस झाला असून, लाइफस्टाइलमध्ये त्याचा परिणाम लगेचच दिसून येतो.
विवेक ओबेरॉय
अभिनेता विवेक ओबेरॉयला सिगारेटच्या असे काही व्यसन जडले होते की, हे व्यसन त्याच्या जिवावर उठले होते. धूम्रपानामुळे त्याला कर्करोग झाला होता. कर्करोग पहिल्याच स्टेजवर असल्याचे लक्षात आल्यानंतर त्यावर उपचार करणे शक्य झाले. सध्या विवेक वर्ल्डहेल्थ आॅर्गनायझेशनच्या अॅण्टी स्मोकिंग मुव्हमेंटचा ब्रॅण्ड अॅम्बेसेडर आहे.
अजय देवगण
सिगारेटचे व्यसन असलेल्या सेलिब्रिटींच्या यादीत अजय देवगणचे नाव नक्कीच पहिल्या पाचमध्ये असेल. अजय सिगारेटच्या इतक्या आधीन गेला होता की, दिवसातून तो अगणित सिगारेटचे व्यसन करायचा. त्याच्या या व्यसनाला पत्नी काजोलचा प्रचंड विरोध होता. ती सातत्याने त्याला या व्यसनापासून दूर राहण्यास सांगत होती. पत्नीचा तगादा लक्षात घेऊन अजयने सिगारेटपासून चार हात लांब राहणे योग्य समजले.
अर्जुन रामपाल
महाविद्यालयीन जीवनापासूनच अभिनेता अर्जुन रामपालला सिगारेटचे व्यसन लागले होते. हे व्यसन त्याच्या अंगी असे काही भिनले होते की, इच्छा असतानाही त्याला त्यापासून दूर जाणे अवघड झाले होते. मात्र जेव्हा या व्यसनाचा विपरित परिणाम त्याच्या मुलांवर होत असल्याची जाणीव झाली तेव्हा मात्र त्याने स्मोकिंगला आयुष्यातून पूर्णपणे हद्दपार केले.
सैफ अली खान
सैफच्या आयुष्यावर स्मोकिंगचा सर्वांत जास्त विपरित परिणाम झाला आहे. कारण या अतिवाइट सवयीमुळेच त्याला एकदा हृदयविकाराचा झटका येऊन गेला आहे. जेव्हा डॉक्टरांनी त्याला या व्यसनापासून दूर राहण्याचा सल्ला दिला तेव्हा त्याने सिगारेट ओढणे पूर्णपणे बंद केले.
आमिर खान
आमिर खानला बॉलिवूडचा मिस्टर परफेक्टनिस्ट असे म्हटले जाते. आयुष्यातील प्रत्येक गोष्ट परफेक्ट व्हावी हा त्याचा आग्रह असतो. धूम्रपानाबाबतही त्याने असेच काहीसे केले. कधीकाळी व्यसनाच्या आहारी गेलेल्या आमिरने सर्वांत छोटा मुलगा आजादचा जन्म होताच स्मोकिंग करणे पूर्णपणे बंद केले.
हृतिक रोशन
हृतिक रोशन हादेखील धूम्रपानाच्या आहारी गेला होता. हृतिकला स्मोकिंगची इतकी लथ लागली होती की, त्याच्यापासून दूर जाण्यासाठी त्याला बराच काळ लागला. त्यासाठी त्याने एका पुस्तकाचे वाचन केले, ज्यामध्ये सिगारेट सोडण्याचे बरेचसे उपाय सांगितले होते. त्यानंतर त्याने त्याचे अनुकरण करीत सिगारेटपासून दूर जाणे योग्य समजले.
सलमान खान
कधीकाळी बॉलिवूडचा दबंग सलमान खान चेनस्मोकर होता. मात्र काही काळापूर्वीच त्याने एका उपचारामुळे धूम्रपान करणे बंद केले. सध्या सलमान प्रचंड हेल्थ काँशियस झाला असून, सिगारेटला हात सुद्धा लावत नाही.
कोंकणा सेन शर्मा
बॉलिवूड अभिनेत्री कोंकणा सेन शर्मा हीदेखील कधीकाळी चेनस्मोकर राहिली आहे. मात्र आई झाल्यानंतर कोंकणाने व्यसनापासून चार हात लांब राहणे पसंत केले. तिने आता स्पष्ट शब्दात ‘नो स्मोकिंग’चा निर्धार केला आहे.