Cannes 2018 : दीपिका पादुकोणचा रेड कार्पेटवरील अंदाज बघून तुम्ही घायाळ व्हाल, पाहा फोटो!
By ऑनलाइन लोकमत | Published: May 12, 2018 01:13 PM2018-05-12T13:13:23+5:302018-05-12T18:43:38+5:30
कान्स २०१८ च्या समारंभात अभिनेत्री दीपिका पादुकोणने रेड कार्पेटवर अशा अंदाजात एंट्री केली की, सर्वांच्याच नजरा तिच्यावर खिळल्या होत्या.
क न्स फिल्म फेस्टिव्हलची धूम सुरू असून, बॉलिवूडमधील अभिनेत्री रेड कार्पेटवर आपला जलवा दाखविण्याची कुठलीच कसर सोडताना दिसत नाहीत. शुक्रवारी तर अभिनेत्री दीपिका पादुकोणने कान्सच्या रेड कार्पेटवर एक वेगळाच रंग भरला. जेव्हा तिची एंट्री झाली तेव्हा सर्वांच्याच नजरा तिच्यावर खिळल्या होत्या. दीपिकाची एक छबी टिपण्यासाठी छायाचित्रकारांमध्ये तर जणूकाही स्पर्धाच लागली होती.
कान्सच्या रेड कार्पेटवरील दीपिकाचे काही फोटोज् समोर आले असून, त्यामध्ये तिचा अंदाज बघण्यासारखा आहे. या फोटोमध्ये दीपिका खूपच स्टनिंग अंदाजात बघावयास मिळत आहे. खरं तर कान्सदरम्यान तिने जो आउटफिट परिधान केला, त्यामध्ये तिचे सौंदर्य खूपच खुलून दिसले. या पिंक कलरच्या या आउटफिटमध्ये तर दीपिका व्हिक्टोरियन युगातील एखाद्या महाराणीसारखी दिसत होती. या अंदाजातील काही फोटोज् शेअर करताना दीपिकाने लिहिले की, ‘होय स्वप्न खरे होत असतात.’
या व्यतिरिक्त दीपिकाने एक छोटासा व्हिडीओदेखील शेअर केला. ज्यामध्ये तिच्या चेहºयावरील आनंद स्पष्टपणे दिसत आहे. तसेच दीपिकाने ब्ल्यू आउटफिटमधीलही एक फोटो शेअर केला. ज्यामध्ये ती खूपच सुंदर दिसत आहे. बॉलिवूडसह हॉलिवूडमध्ये आपला जलवा दाखविणाºया दीपिकाने जेव्हा तिचे हे फोटो शेअर केले तेव्हा सोशल मीडियावर तिच्या बोल्डनेसची एकच चर्चा रंगली.
दरम्यान, दीपिका व्यतिरिक्त कंगना राणौत, मल्लिका शेरावत, हुमा कुरेशी या अभिनेत्रींनीही कान्सच्या रेड कार्पेटवर आपला जलवा दाखविला. ७१वा कान्स समारंभ ८ ते १९ मे २०१८ यादरम्यान सुरू राहणार आहे.