"बच्चन घराण्याचे संस्कार", हात फ्रॅक्चर असलेल्या आईला सांभाळताना दिसली आराध्या, ऐश्वर्याच्या लेकीचं होतंय कौतुक

By ऑनलाइन लोकमत | Published: May 17, 2024 08:30 AM2024-05-17T08:30:33+5:302024-05-17T08:32:38+5:30

Cannes 2024 : हाताला दुखापत झालेली असूनही ऐश्वर्याने कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये सहभाग घेतल्याने तिचं कौतुक होत आहे. पण, तिच्याबरोबरच लेक आराध्यचं नेटकरी कौतुक करत आहेत. 

cannes film festival aishwarya rai hand injury daughter aaradhya supports mother on red carpet | "बच्चन घराण्याचे संस्कार", हात फ्रॅक्चर असलेल्या आईला सांभाळताना दिसली आराध्या, ऐश्वर्याच्या लेकीचं होतंय कौतुक

"बच्चन घराण्याचे संस्कार", हात फ्रॅक्चर असलेल्या आईला सांभाळताना दिसली आराध्या, ऐश्वर्याच्या लेकीचं होतंय कौतुक

आंतरराष्ट्रीय स्तरावरील प्रतिष्ठित मानल्या जाणाऱ्या कान्स फिल्म फेस्टिव्हलला सुरुवात झाली आहे. यंदाही रेड कार्पेटवर बॉलिवूड आणि हॉलिवूडमधील सिताऱ्यांचा जलवा पाहायला मिळाला. मिस वर्ल्ड ऐश्वर्या राय बच्चननेही कान्स फेस्टिव्हलमध्ये सहभाग घेतला होता. हाताला दुखापत झालेली असतानाही ऐश्वर्या या फेस्टिव्हलमध्ये सहभागी झाली होती. ऐश्वर्याबरोबर तिची लेक आराध्या बच्चनही दिसली. 

कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये ऐश्वर्याने फॅशन जलवा दाखवला. तिच्या सौंदर्याने पुन्हा एकदा चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं. काळ्या रंगाचा डिझायनर लाँग गाऊन घालून ऐश्वर्या कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये पोहोचली होती. या फेस्टिव्हलमधील ऐश्वर्याचा एक व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओत ती लेक आराध्याबरोबर दिसत आहे. हाताला दुखापत झालेली असूनही ऐश्वर्याने कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये सहभाग घेतल्याने तिचं कौतुक होत आहे. पण, तिच्याबरोबरच लेक आराध्यचं नेटकरी कौतुक करत आहेत. 

हात फ्रॅक्चर असलेल्या आईला सांभाळताना या व्हिडिओत आराध्या दिसत आहे. ऐश्वर्याचा हात पकडून आराध्या तिला आधार देत असल्याचं व्हिडिओत पाहायला मिळत आहे. हा व्हिडिओ पाहून नेटकऱ्यांनी आराध्यावर कौतुकाचा वर्षाव केला आहे. "ही १२ वर्षांची आहे यावर विश्वास बसत नाही", "बच्चन घराण्याचे संस्कार" अशा कमेंट्स या व्हिडिओवर नेटकऱ्यांनी केल्या आहेत.  

Web Title: cannes film festival aishwarya rai hand injury daughter aaradhya supports mother on red carpet

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.