Youtube vs TikTok : व्हिडीओ डिलीट केला म्हणून भावूक झाला कॅरी मिनाटी, फॅन्सना करतोय अपील

By ऑनलाइन लोकमत | Published: May 18, 2020 01:45 PM2020-05-18T13:45:26+5:302020-05-18T13:45:49+5:30

या व्हिडीओत कॅरी खूपच भावूक झालेले दिसतोय.

Carry minati gets emotional in his latest video and appeal viewers to stop making assumptions gda | Youtube vs TikTok : व्हिडीओ डिलीट केला म्हणून भावूक झाला कॅरी मिनाटी, फॅन्सना करतोय अपील

Youtube vs TikTok : व्हिडीओ डिलीट केला म्हणून भावूक झाला कॅरी मिनाटी, फॅन्सना करतोय अपील

googlenewsNext

गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर  युट्यूब विरूद्ध टिक टॉक असे ‘महाभारत’ सोशल मीडियावर छेडले आहे. कॅरी मिनाटीने Youtube vs TikTok: मध्ये टिक टॉक स्टार आमिर सिद्दीकीला रोस्ट केले होते. कॅरीच्या या व्हिडीओला नेटक-यांना तुफान प्रतिसाद मिळाला होता. एवढेच नाही तर तो भारतातील सर्वाधिक लाइक्स मिळवणारा व्हिडीओ ठरला होता. पण अचानक युट्यूबने कॅरीला हा व्हिडीओ डिलीट केला. युट्यूब विरूद्ध टिकटॉकचा हा व्हिडीओ मापदंडाविरोधी असल्याचे सांगत युट्यूबने तो हटवला.

यानंतर ट्विटरवर #justiceforcarry, #BringBackCarryVideo, #carryminatitiktokroast असे हॅशटॅग ट्रेंड करू लागले़ अनेकांनी कॅरीला सपोर्ट केला. आता कॅरीने आपल्या फॅन्ससोबत आपली बाजू मांडत एक व्हिडीओ शेअर केला आहे. कॅरीने  STOP MAKING ASSUMPTIONS नावाचा व्हिडीओ शेअर केला आहे. यात कॅरी म्हणतोय, ''व्हिडीओ डिलीट केले म्हणून मी फार दु:खी आहे. हा व्हिडीसंओ यातील संवादामुळे की अन्य कारणामुळे डिलीट केला आहे हे अद्याप मला कळलेले नाही. लोक माझं बोलणं चुकीच्या पद्दतीने मांडतायेत हे मी बघतो आहे.'' या व्हिडीओत कॅरी खूपच भावूक झालेले दिसतोय.

तो युट्यूबचा सर्वाधिक लोकप्रिय स्टार आहे. त्याचे खरे नाव अजय नागर. कॉमेडियन, रॅपर आणि आता युट्यूब स्टार अशी त्याची ओळख आहे. फरीदाबादचा या अजयचे युट्यूबवर CarryMinati व ​​CarryIsLive अशी दोन चॅनल्स आहेत़ युट्यूब करिअरसाठी कॅरीने मध्येच शिक्षण सोडले. होय, अगदी 12 वीची परीक्षा न देण्याचा निर्णय त्याने घेतला. अर्थात पुढे त्याने हे शिक्षण पूर्ण केले, हा भाग वेगळा. अजय नागर कॅरी मिनाटी नावाने युट्यूबवर लोकप्रिय आहे. युट्यूबवर लोकांची खिल्ली उडवणारे व्हिडीओ शेअर करणे शिवाय लाईव्ह गेमिंगसाठी तो ओळखला जातो. 
 

Web Title: Carry minati gets emotional in his latest video and appeal viewers to stop making assumptions gda

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.