Youtube vs TikTok: युट्यूबने डिलीट केला कॅरी मिनाटीचा ‘रोस्ट’ व्हिडीओ, सोशलवर तुफान राडा !
By ऑनलाइन लोकमत | Published: May 15, 2020 04:29 PM2020-05-15T16:29:10+5:302020-05-15T16:38:31+5:30
Youtube vs TikTok: का ट्रेंड होतोय #justiceforcarry? जाणून घ्या काय आहे भानगड
गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर लॉकडाऊन व कोरोनाशिवाय आणखी एक मुद्दा ट्रेंड होतोय. होय, युट्यूब विरूद्ध टिक टॉक असे ‘महाभारत’ सोशल मीडियावर छेडले आहे. युट्यूब व टिक टॉक या दोन्ही व्हिडीओ ब्लॉगिंग साइट्स आहेत. दोन्हींमध्ये खरे तर खूप फरक आहे. पण तरीही युट्यूब विरूद्ध टिक टॉक वॉर रंगलेय. तर या वॉरची सुरुवात झाली होती आमिर सिद्दीकी या लोकप्रिय टिक टॉकरच्या व्हिडीओने. होय, आमिरने युट्यूबर्सची खिल्ली उडवणारा व्हिडीओ शेअर केला होता. मग काय, दिग्गज युट्यूबर कॅरी मिनाटीने आमिरला त्याच्याच भाषेत उत्तर देत ‘रोस्ट’ केले होते. कॅरीचा हा व्हिडीओ तुफान व्हायरल झाला होता.
पण आता युट्यूबने कॅरीचा हा व्हिडीओ डिलीट केला आणि नेटक-यांनी ट्विटरवर नुसता गोंधळ घातला.
• Fastest indian video to 1M likes ( 2hrs )
— Meme Devta 🦸♂️ (@MilindPanwar) May 14, 2020
• Fastest indian video to 2M likes ( 5 hrs )
• Fastest indian video to 3M likes ( 9hrs )
• Fastest indian video to 4M likes ( 17hrs )
• Fastest indian video to 5M likes ( 22hrs )
STILL THE VIDEO GOT DELETED !! #carryminatipic.twitter.com/eeCcA3rXAU
होय, ट्विटरवर #justiceforcarry, #BringBackCarryVideo, #carryminatitiktokroast असे हॅशटॅग ट्रेंड करू लागले़ अनेकांनी कॅरीला सपोर्ट केला. युट्युबर हर्ष बेनीवालनेही कॅरीला सपोर्ट केला़ ‘पहले चोरी, उपर से सीना जोरी.. खुशी में साथ थे, मुश्किलों में भी रहेंगे...आएंगे और रूलाएंगे,’ असे त्याने लिहिले.
Public Pagal hai Kuch bhi karwa skti hai!
— DRAZOX (@TilakKumar8986) May 15, 2020
We are all with you♥️#carryminati#justiceforcarry@CarryMinatipic.twitter.com/8KWCc4oB5b
#justiceforcarry#shameonyoutube#bringbackcarrysvideo#shameonyoutube#justiceforcarry#carryminatipic.twitter.com/9Dx8y4yzw1
— badboyshubham (@Shubham60416610) May 15, 2020
#carryminnati#justiceforcarry
— Harish singh (@Harishs20318147) May 15, 2020
Me to - @TikTok_IN#BanTikTokIndiapic.twitter.com/4RGqAYKQgh
युट्यूबने का डिलीट केला व्हिडीओ
कॅरी मिनाटीने Youtube vs TikTok: मध्ये टिक टॉक स्टार आमिर सिद्दीकीला रोस्ट केले होते. कॅरीच्या या व्हिडीओला नेटक-यांना तुफान प्रतिसाद मिळाला होता. एवढेच नाही तर तो भारतातील सर्वाधिक लाइक्स मिळवणारा व्हिडीओ ठरला होता. पण अचानक युट्यूबने कॅरीला हा व्हिडीओ डिलीट केला. युट्यूब विरूद्ध टिकटॉकचा हा व्हिडीओ मापदंडाविरोधी असल्याचे सांगत युट्यूबने तो हटवला.
कोण आहे कॅरी मिनाटी?
नव्या पिढीला कॅरी मिनाटी हे नाव नवे नाही. तो युट्यूबचा सर्वाधिक लोकप्रिय स्टार आहे. त्याचे खरे नाव अजय नागर. कॉमेडियन, रॅपर आणि आता युट्यूब स्टार अशी त्याची ओळख आहे. फरीदाबादचा या अजयचे युट्यूबवर CarryMinati व CarryIsLive अशी दोन चॅनल्स आहेत़
युट्यूब करिअरसाठी कॅरीने मध्येच शिक्षण सोडले. होय, अगदी 12 वीची परीक्षा न देण्याचा निर्णय त्याने घेतला. अर्थात पुढे त्याने हे शिक्षण पूर्ण केले, हा भाग वेगळा.
अजय नागर कॅरी मिनाटी नावाने युट्यूबवर लोकप्रिय आहे. युट्यूबवर लोकांची खिल्ली उडवणारे व्हिडीओ शेअर करणे शिवाय लाईव्ह गेमिंगसाठी तो ओळखला जातो.
वयाच्या 10 व्या वर्षापासून कॅरीने युट्यूबवर व्हिडीओ पोस्ट करणे सुरु केले होते. अगदी सुरुवातीला सनी देओलची मिमिक्री करणारा व्हिडीओ त्याने पोस्ट केला होता. 2014 मध्ये त्याने कॅरीमिनिटी हे मूळ युट्यूब चॅनल सुरु केले. 2017 मध्ये CarryIsLive आणखी एक युट्यूब चॅनल उघडले.
कॅरीने जानेवारी 2019 मध्ये युट्यूबपर Pewdiepie विरोधात 'Bye Pewdiepie' नावाने एक डिस गाणे साद केले होते. ते प्रचंड लोकप्रिय झाले होते. 24 तासांत या गाण्याला 5 मिलियन व्ह्युज मिळाले होते. 2019 या सालात टाईम मॅगझिनद्वारा नेक्स्ट जनरेशन लीडर्स 2019 व्या यादीत कॅरी दहाव्या क्रमांकावर होता. इनोव्हेटिव्ह करिअर करणा-या युवांची ही यादी टाईम मॅगझिन दरवर्षी प्रसिद्ध करते.