कोरिओग्राफर रेमो डिसुझावर गुन्हा दाखल, कोट्यवधींची फसवणुक केल्याचा पत्नीवरही आरोप, नेमकं प्रकरण काय?
By ऑनलाइन लोकमत | Published: October 18, 2024 12:23 PM2024-10-18T12:23:35+5:302024-10-18T12:24:11+5:30
रेमो डिसुझा कायद्याच्या कचाट्यात अडकला आहे. एका डान्स ग्रुपची फसवणूक केल्याप्रकरणी रेमो डिसुझावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रेमो डिसुझा हे बॉलिवूडमधील लोकप्रिय नाव आहे. अफलातून डान्सने चाहत्यांना वेड लावणारा रेमो डिसुझा कायद्याच्या कचाट्यात अडकला आहे. रेमो डिसुझावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुंबई हायकोर्टाच्या आदेशानंतर रेमो डिसुझावर हा गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती मिळत आहे. एका डान्स ग्रुपची फसवणूक केल्याप्रकरणी रेमो डिसुझावर हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे रेमो डिसुझा चर्चेत आला आहे.
नेमकं प्रकरण काय?
सुप्रसिद्ध कोरिओग्राफर रेमो डिसुझावर व्हि अनबिटेबल या डान्स ग्रुपची तब्बल १२ कोटींची फसवणुक केल्याचा आरोप करण्यात आला आहे. याप्रकरणी मीरारोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. डान्स ग्रुपने तक्रार करुनही कोणतीच कारवाई न झाल्याने त्यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यानंतर न्यायालयाने या प्रकरणाचा तपास करण्याचे आदेश पोलिसांना दिले आहेत. रेमो डिसुझासह त्याची पत्नी आणि इतर ७ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.त्यामुळे रेमो डिसुझा वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे.
रेमो डिसुझा हा बॉलिवूडमधील सुप्रसिद्ध डान्सर आणि कोरिओग्राफर आहे. 'डान्स इंडिया डान्स' या शोमध्ये परिक्षकाच्या भूमिकेत त्याने अनेक डान्सर घडवले. या शोने त्याला वेगळी ओळख मिळवून दिली. त्याने अनेक बॉलिवूड गाण्यांना कोरिओग्राफ केलं आहे.