'Adipurush' मध्ये रावणाला दयाळू सांगणं सैफला पडलं महागात, माफी मागूनही दिल्लीत केस दाखल....

By ऑनलाइन लोकमत | Published: December 8, 2020 01:23 PM2020-12-08T13:23:17+5:302020-12-08T13:26:31+5:30

रावणाने केलेल्या सीता हरणालाही आम्ही न्यायसंगत दाखवणार आहोत'. याबाबत नाराजी व्यक्त झाल्याने सैफ अली खानने माफीही मागितली होती.

Case filed against Saif Ali Khan for making objectionable statements on Adipurush | 'Adipurush' मध्ये रावणाला दयाळू सांगणं सैफला पडलं महागात, माफी मागूनही दिल्लीत केस दाखल....

'Adipurush' मध्ये रावणाला दयाळू सांगणं सैफला पडलं महागात, माफी मागूनही दिल्लीत केस दाखल....

googlenewsNext

रामायणावर तयार होत असलेल्या 'आदिपुरूष' सिनेमात अभिनेता सैफ अली खान हा रावणाची भूमिका साकारणार आहे. पण या रावणाबाबत एक वादग्रस्त वक्तव्य करणं सैफ अली खानला महागात पडलं आहे. ‘आदिपुरुष’ मधील आपल्या भूमिकेबद्दल बोलता होता. ‘आदिपुरुष’या चित्रपटात लंकेशची व्यक्तिरेखा वाईट नसून मनोरंजक आहे. रावणाने केलेल्या सीता हरणालाही आम्ही न्यायसंगत दाखवणार आहोत'. याबाबत नाराजी व्यक्त झाल्याने सैफ अली खानने माफीही मागितली होती.

काय म्हणाला होता सैफ?

अलीकडेच मुंबई मिररला दिलेल्या मुलाखतीत सैफ अली खान ‘आदिपुरुष’ मधील आपल्या भूमिकेबद्दल बोलता होता. ‘आदिपुरुष’या चित्रपटात लंकेशची व्यक्तिरेखा वाईट नसून मनोरंजक आहे. आम्ही ती अतिशय मनोरंजक पद्धतीने सादर करणार आहोत. रावणाने केलेल्या सीता हरणालाही आम्ही न्यायसंगत दाखवणार आहोत. रावणाला आपण आजपर्यंत खलनायकाच्या भूमिकेत पाहिले. पण तो खलनायक नव्हता. तो देखील एक माणूस होता. रामासोबतचे त्याचे युद्ध ही सूडाची कहाणी असल्याचे आम्ही दाखवणार आहोत. जे लक्ष्मणाने रावणाची बहीण शुर्पणखाचे नाक कापल्यामुळे सुरू झाले होते, असे सैफ या मुलाखतीत म्हणाला होता. (सैफ अली खानने वादानंतर मागितली जाहीर माफी, रावणाबाबत केलं होतं वादग्रस्त वक्तव्य....)

त्याच्या या वक्तव्यावर सोशल मीडियावर तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. बॉयकॉट आदिपुरूष, वेकअप ओमराऊत असे हॅशटॅग ट्रेंड होत आहे. अनेकांनी सैफला सिनेमातून काढून टाकण्याची मागणीही केली आहे.

रावणाने केलेल्या सीता हरणालाही आम्ही न्यायसंगत दाखवणार आहोत. पण तो खलनायक नव्हता. तो देखील एक माणूस होता. रामासोबतचे त्याचे युद्ध ही सूडाची कहाणी असल्याचे आम्ही दाखवणार आहोत. जे लक्ष्मणाने रावणाची बहिण शुर्पणखाचे नाक कापल्यामुळे सुरू झाले होते. सैफच्या या वक्तव्यामुळेच दिल्लीत त्याच्या विरोधात केस दाखल केली गेली आहे. सैफ विरोधात विश्व हिंदू महासंघाच्या दिल्लीतील राजेश तोमर या प्रदेशाध्यक्षांनी केस दाखल केली आहे. (नको तुझी ‘सॉरी’, बोलण्यापूर्वी विचार का केला नाहीस? मुकेश खन्ना सैफवर भडकले)

'आदिपुरूष' सिनेमाचं शूटींग अजून सुरू झालेलं नाही. पण असा अंदाज आहे की, सिनेमाचं शूटींग लवकरच सुरू होईल. यात सैफ अली खान रावणाची भूमिका साकारणार आहे तर प्रभास रामाची भूमिका साकारणार आहे. तर दुसरीकडे सीतेची भूमिका अभिनेत्री क्रिती सेनन साकारणार अशी चर्चा सुरू आहे.

धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप

विश्व हिंदू महासंघाचे दिल्ली प्रदेश अध्यक्ष राजेश तोमर यांनी दिल्लीत केस दाखल केली आहे. आपल्या तक्रारीत राजेश तोमर म्हणाले की, सैफ अली खानने मुद्दामहून हे वक्तव्य केल. जेणेकरून धार्मिक भावना दुखावल्या जाव्यात. सैफच्या या वक्तव्यामुळे कोट्यवधी हिंदूंच्या भावना दुखावल्या आहेत. समाजात शांतता भंग होण्याचा धोका वाढला आहे. 
 

Web Title: Case filed against Saif Ali Khan for making objectionable statements on Adipurush

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.