किस्सा ‘किस सीन’चा

By ऑनलाइन लोकमत | Published: September 18, 2016 08:44 AM2016-09-18T08:44:07+5:302016-09-18T16:49:16+5:30

पूर्वी बॉलिवूडपटांमध्ये ‘किस सीन’ देणे फारच जोखमीचे समजले जात होते. स्क्रीप्टची फारच डिमांड असल्यास खास टेक्निकचा वापर करून किस ...

Casey 'Kiss Scenes' | किस्सा ‘किस सीन’चा

किस्सा ‘किस सीन’चा

googlenewsNext
र्वी बॉलिवूडपटांमध्ये ‘किस सीन’ देणे फारच जोखमीचे समजले जात होते. स्क्रीप्टची फारच डिमांड असल्यास खास टेक्निकचा वापर करून किस सीन दाखविला जात असे. मात्र, सध्या चित्रपटात किस सीन देणे सामान्य बाब झाली आहे. परंतु भारतीय संस्कृती लक्षात घेता बरेचशा किस सीनमुळे कॉन्ट्रोर्व्हसी निर्माण झाली आहे. सध्या यशराज बॅनरचा ‘बेफिक्रे’ हा चित्रपट याच कारणास्तव चर्चेत आला आहे. चित्रपटातील एका ३ मिनिट १६ सेकंदांच्या गाण्यात तब्बल २५ किस सीन दाखविण्यात आले आहेत. मात्र आश्चर्याची बाब म्हणजे सेंसार बोर्डाच्या कचाट्यातून या गाण्याची सुटका करण्यात निर्माते यशस्वी ठरले आहेत. कारण याच वर्षी रिलिज झालेल्या रणदीप हुड्डा याच्या ‘दो लफ्जो की कहानी’ चित्रपटातील किसिंग सीनच्या टायमिंगवर सेंसारने आक्षेप घेत सर्व किसिंग सीन १८ ते ९ सेंकदांचे असावेत असा आदेश देत किसिंग सीनला कात्री लावली होती. मात्र ‘बेफिक्रे’च्या निर्मात्यांनी अतिशय चलाखीने या टायमिंगचे तंतोतंत पालन करीत सर्व सीन ९ सेकंदाचेच दाखविले आहेत. त्यामुळे सेंसारला या गाण्याला हिरवा झेंडा दाखवावा लागला. यापूर्वीदेखील बºयाचशा चित्रपटातील ‘किस सीन’मुळे कॉन्ट्रोव्हर्सी निर्माण झाली आहे.


‘रामलीला’मधील रोमांस सुपरहिट 
संजय लीला भंसाली यांच्या ‘रामलीला’ या सुपरहिट चित्रपटातील संवाद आणि किस सीनमुळे कॉन्ट्रोव्हर्सी निर्माण झाली होती. केवळ तरुणांना आकर्षित करण्यासाठीच अशाप्रकारचे सीन चित्रपटात दाखविण्यात आल्याचा आरोपही भंसाली यांच्यावर करण्यात आला होता. वास्तविक चित्रपटाची कथा ही जुनीच होती. दोन कुटुंबातील वाद यामध्ये दाखविण्यात आला होता. परंतु गाणे आणि रणबीर-दीपिकाचा रोमांस प्रेक्षकांना खूपच भावला. हेच चित्रपटाच्या यशाचे गमक ठरले. 


शुद्ध देसी रोमांस
‘मर्डर’ या चित्रपटात इमरान हाशमी आणि मल्लिका शेरावत यांनी तब्बल १७ किस सीन देऊनखळबळ उडवून दिली होती. खरं तर त्यावेळेस हा बॉलिवूडपटातील किस सीनचा एक रेकॉर्डच होता. मात्र यशराज बॅनरच्या ‘शुद्ध देसी रोमांस’ या चित्रपटात सुशांत शर्मा आणि परिणिती चोपडा यांनी तब्बल २७ किसिंग सीन देऊन नवा रेकॉर्ड केला होता. त्यामुळे या चित्रपटाला टीकेचा सामना करावा लागला. सेंसारने चित्रपटातील किसिंग सीनला कात्री लावावी असा सूरही त्यावेळेस व्यक्त केला गेला. 


‘टू स्टेट्स’चा रिटेक
चेतन भगत याच्या बहुचर्चित कादंबरीवर आधारित असलेल्या ‘टू स्टेट्स’ या चित्रपटातील आलिया भट्ट आणि अर्जुन कपूर यांच्यातील किसिंग सीन चांगलाच गाजला. या सीनचे वैशिष्ट्ये म्हणजे आलिया भट्ट हिने तब्बल ६ वेळा रिटेक्स घेत हा सीन पूर्ण केला. त्यामुळे ती काही काळ टीकेची धनी ठरली होती. अखेर भट्ट कुटुंबाकडून आलिया समजूतदार असून, निर्णय घेण्यास सक्षम असल्याचे स्पष्ट करीत या प्रकरणावर पडदा टाकला. 


‘राजा हिंदुस्तानी’चा रेकॉर्ड
धर्मेश दर्शन यांचा सुपरहिट ‘राजा हिंदुस्तानी’ हा चित्रपट गाण्यांमुळे जेवढा स्मरणात आहे, तेवढाच केवळ एका किसिंग सीनमुळे आठवणीत आहे. मिस्टर परफेक्टनिस्ट आमिर खान आणि करिष्मा कपूर यांच्यात शूट करण्यात आलेला आतापर्यंत सर्वात लांब किसिंग सीन या चित्रपटात दाखविण्यात आला आहे. हा सीन शूट करण्यासाठी आमिरने तब्बल २१ वेळा रिटेक्स घेतला होता. त्यावेळेस या सीनमुळे बॉलिवूडमध्ये एकच खळबळ उडाली होती. 


सीरियल किसरचा विक्रम
सीरियल किसर म्हणून इमेज असलेल्या इमरान हाशमी याच्या नावे किसिंग सीनचा रेकॉर्ड नसेल तरच नवल. आपल्या प्रत्येक चित्रपटात कंप्लसरी किसिंग सीन देणाºया इमरानने ‘राज-३’ या चित्रपटात सर्वांत लांब किसिंग सीन देऊन रेकॉर्ड केला. चित्रपटात बिपाशा बसू आणि ईशा गुप्ता या दोन्ही अभिनेत्रींसोबत इमरान रोमांस करताना दिसला. मात्र ईशा गुप्तासोबत त्याने तब्बल २० मिनिटे किसिंग सीन देऊन एकच खळबळ उडवून दिली. अखेर सेंसारने या सीनला कात्री लावत त्याची वेळमर्यादा कमी केली. 


किंग खानने तोडला रूल
एकाही चित्रपटात लिप लॉक सीन देणार नाही, असे सांगणाºया किंग खान अर्थात शाहरूखनेदेखील रूल तोडत लिप लॉक सीन देऊन चर्चा निर्माण केली होती. २०१२ मध्ये आलेल्या ‘जब तक है जान’ या चित्रपटात त्याने कॅटरिनासोबत रोमांस करताना हा सीन दिला. ज्यावेळेस त्याला याबाबत विचारण्यात आले, तेव्हा त्याने स्क्रिप्टच्या डिमांडनुसार आणि यश चोपड यांच्या आग्रहास्तव हा सीन देण्यास राजी झाल्याचे सांगितले होते. चित्रपटामधील दोघांची केमिस्ट्री चांगलीच रंगली होती. 

Web Title: Casey 'Kiss Scenes'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.