Casting Couch : ‘या’ अभिनेत्रीने सांगितले तिचे दु:ख; ‘पाच निर्माते माझ्याशी दुष्कर्म करू इच्छित होते’!

By ऑनलाइन लोकमत | Published: January 19, 2018 04:46 PM2018-01-19T16:46:01+5:302018-01-19T22:16:01+5:30

साउथ इंडियन चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री श्रुती हरिहरन हिने मान्य केले की, ती कास्टिंग काउचला बळी पडली आहे. श्रुतीने याविषयीचा ...

Casting Couch: 'The actress said her sorrow; 'The five creators wanted to do bad things to me'! | Casting Couch : ‘या’ अभिनेत्रीने सांगितले तिचे दु:ख; ‘पाच निर्माते माझ्याशी दुष्कर्म करू इच्छित होते’!

Casting Couch : ‘या’ अभिनेत्रीने सांगितले तिचे दु:ख; ‘पाच निर्माते माझ्याशी दुष्कर्म करू इच्छित होते’!

googlenewsNext
उथ इंडियन चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री श्रुती हरिहरन हिने मान्य केले की, ती कास्टिंग काउचला बळी पडली आहे. श्रुतीने याविषयीचा धक्कादायक खुलासा करताना सांगितले की, एक निर्माता तिला त्याच्या चार अन्य निर्मात्यांसोबत तडजोड करण्यास सांगत होता. श्रुतीने याबाबतचा खुलासा ‘सेक्सिजम इन सिनेमा : टाइम टू अ‍ॅण्ड पेट्रीआर्की’च्या मुद्दावर आयोजित केलेल्या चर्चेत केला. श्रुतीने म्हटले की, चित्रपटात मुलींच्या भूमिका नेहमीच समाजात प्रचलित असलेल्या परंपरांवर आधारित असतात. बºयाचशा चित्रपटात तर मुलींना कमोडिटीच्या आधारे शूट केली जाते. जेणेकरून ती सुंदर, सेक्सी दिसावी व चित्रपट चालावा. 

पुढे बोलताना श्रुतीने म्हटले की, चित्रपटांमध्ये स्त्रियांना निर्णय घेण्याच्या भूमिकेत ठेवले जात नाही. याच कारणामुळे मला कास्टिंग काउचचा सामना करावा लागला. त्याचे झाले असे की, मी एका कन्नड चित्रपटाच्या कास्टिंगसाठी गेली होती. त्याठिकाणी मला एका निर्मात्याने म्हटले की, या चित्रपटासाठी आम्ही एकूण पाच निर्माते आहोत. त्यामुळे तुझा आम्ही कधीही व कशाही पद्धतीने वापर करू. याबद्दल श्रुतीने म्हटले की, ‘आताच्या काळात महिलांनी शांत राहणे हा काही त्यांच्यासाठी पर्याय नाही. वास्तविक पब्लिक स्पेस महिलांसाठी उपलब्ध नाही. कारण आजही समाज पूर्णत: पुरूषप्रधान आहे. मात्र चित्रपटांमधील महिलांचा सहभाग पाहता त्या पब्लिकमध्ये स्पेस निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहेत. 

श्रुतीने म्हटले की, ‘इंडस्ट्रीमध्ये काम करणाºया प्रत्येक तरुणींना कास्टिंग काउचचा सामना नकाराने करण्याची गरज आहे. माझ्या मते, अशा प्रकारासाठी केवळ पुरुषांना चुकीचे ठरविणे योग्य नाही. कारण जोपर्यंत महिला नकार देत नाहीत, तोपर्यंत पुरुषांना दोष देणे चुकीचे आहे. कास्टिंग काउचच्या माध्यमातून पहिली संधी नक्कीच मिळते, परंतु याच्या आधारे तुम्ही करिअर करू शकत नाही. असो, श्रुतीने केलेल्या या धक्कादायक खुलाशानंतर इंडस्ट्रीत कास्टिंग काउचचा विळखा आणखी गडद होताना दिसत आहे. 

Web Title: Casting Couch: 'The actress said her sorrow; 'The five creators wanted to do bad things to me'!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.