Cat Fight : कॅटरिना कैफने असे काही केले ज्यामुळे दीपिका पादुकोणला बसला धक्का!
By ऑनलाइन लोकमत | Published: February 8, 2018 12:11 PM2018-02-08T12:11:00+5:302018-02-08T17:41:00+5:30
बॉलिवूडमध्ये ‘कॅट फाइट’ काही नवी नाही. परंतु दीपिका पादुकोण आणि कॅटरिना कैफ यांच्यातील कॅट फाइट सध्या चांगलीच रंगताना दिसत ...
ब लिवूडमध्ये ‘कॅट फाइट’ काही नवी नाही. परंतु दीपिका पादुकोण आणि कॅटरिना कैफ यांच्यातील कॅट फाइट सध्या चांगलीच रंगताना दिसत आहे. कारण या दोघीही सध्या एकमेकींना डिवचण्याची एकही संधी सोडत नसल्याने पुन्हा एकदा बॉलिवूडमध्ये कोल्ड वॉर सुरू झाल्याचे दिसून येत आहे. काही दिवसांपूर्वीच दीपिकाने एका मुलाखतीत म्हटले होते की, ‘मी कॅटरिनाला माझ्या लग्नात बोलाविणार नाही.’ आता दीपिका कॅटला का बोलाविणार नाही? हे नव्याने सांगण्याची गरज नाही. कारण दोघींमधील या युद्धाचे कारण अभिनेता रणबीर कपूर असल्याचे आता सर्वांनाच कळून चुकले आहे.
असो, दीपिकाच्या या हल्ल्यानंतर आता कॅटने तिच्या कृतीतून तिला उत्तर दिले. मात्र तिची ही कृती बघून अनेकांना धक्का बसला आहे. कारण तिच्या या कृतीतून असे दिसून आले की, तिला हे कोल्ड वॉर लवकरात लवकर संपवायचे आहे. वास्तविक काही दिवसांपूर्वीच कॅटला एका टॉक शोदरम्यान ‘तू दीपिकाला मैत्रीण मानतेस काय?’ असे विचारले होते, यावर तिने चुप्पी साधणे पसंत केले. त्यावेळी असा कयास लावला जात होता की, कॅट दीपिकाला मैत्रीण मानत नसावी. परंतु आता कॅटने असे काही केल्यास जे बघून दीपिकालाही धक्का बसेल.
होय, कॅटने दीपिकासोबत मैत्री करण्यासाठी एक पाऊल पुढे टाकले आहे. त्यासाठी तिने सोशल मीडियाचा आधार घेतला. त्याचे झाले असे की, दीपिकाने शेअर केलेल्या तिच्या एका फोटोला चक्क कॅटरिनाने लाइक केले. डिझायनर अनामिक खन्ना हिने दीपिकाचा एक फोटो तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर केला होता. ज्यास चक्क कॅटरिनाने लाइक केले. त्यामुळे असा अंदाज लावला जात आहे की, कॅटरिना दीपिकाची गैरसमजूत दूर करू इच्छिते.
दीपिका आणि कॅटरिना या दोघीही रणबीर कपूरच्या एक्स गर्लफ्रेंड आहेत. रणबीरमुळेच दोघींमध्ये वाद निर्माण झाला होता. आता या दोघीही रणबीरपासून दुरावल्या असून, एकमेकींबद्दल असलेला गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न करीत आहेत. त्याचे एक पाऊल कॅटरिनाने टाकले आहे.