राखी सावंत आणि शर्लिन चोप्रामधील कॅटफाईट संपली; ट्रोलर्स म्हणाले - दोघीही ड्रामेबाज
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 4, 2023 13:43 IST2023-09-04T13:42:12+5:302023-09-04T13:43:29+5:30
शर्लिन आणि राखीचा गळाभेटीचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

Rakhi Sawant and Sherlyn Chopra
ड्रामा क्वीन म्हणून प्रसिद्ध असलेली राखी सावंत ही कायम सोशल मीडियावर चर्चेत असते. राखी सावंतचे व्हिडिओ आणि फोटो सतत व्हायरल होत असतात. राखी आणि तिचा पती आदील खान यांच्यातील वाद जगजाहिर आहे. दोघेही एकमेंकावर आरोप करण्याची एकही संधी सोडत नाहीत. दोघांच्या वादात अभिनेत्री शर्लिन चोप्राने उडी घेत रक्षाबंधनाला आदिल खानला राखी बांधली होती. मात्र आता समोर आलेल्या व्हिडिओने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे. शर्लिन आणि राखी पुन्हा एकत्र आल्या आहेत. दोघींच्या गळाभेटीचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.
राखी आणि शर्लिन या दोन अभिनेत्रींमध्ये जोरदार कॅटफाईट पाहायला मिळली. पण, आता दोघींनी आपल्यातील वाद मिटवला आहे. दोन्ही अभिनेत्री मीडियासमोर मैत्री निभवण्याच्या शपथा घेतल्याचे दिसून आले आहे. व्हायरल व्हिडिओमध्ये राखी सावंत आणि शर्लिन चोप्रा एकमेकांना मिठी मारताना दिसत आहेत. दोघींच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून त्यांच्यातील सर्व कटुता दूर झाल्याचे दिसत आहे.
राखी आणि शर्लिनचा पुन्हा चांगल्या मैत्रिणी झाल्याने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे. या व्हिडिओवर युजरकडून अनेक मनोरंजक कमेंटही आल्या. काहीजण याला पब्लिसिटी स्टंट म्हणत आहेत. तर काहीजण या दोघींना ड्रामा क्वीन्स म्हणत आहेत.
शर्लिन चोप्रा आणि राखी सावंत यांच्यात एकेकाळी 36चा आकडा होता. दोघींमधील वैर जगजाहीर होते. एकमेकींवर कुरघोडी करण्याची एकही संधी दोघी सोडताना दिसत नव्हत्या. पण आता चित्र पालटले आहे. शर्लिन आणि राखी एकमेकींच्या घट्ट मैत्रिणी झाल्या आहेत. बरं, ते काहीही असलं तरी यावेळी राखी आणि शर्लिनची मैत्री किती दिवस टिकते हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे.