निर्माता बंटी वालियाविरोधात गुन्हा दाखल, ११९ कोटी रुपयांच्या फसवणुकीप्रकरणी सीबीआयची कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Published: May 29, 2023 10:18 AM2023-05-29T10:18:33+5:302023-05-29T10:20:26+5:30

संजय दत्त, बिपाशा बासू आणि कुणाल कपूर यांच्या 'लम्हा' या सिनेमाचं निर्मिती प्रकरण

CBI registered case against producer Bunty Walia regarding bank fraud | निर्माता बंटी वालियाविरोधात गुन्हा दाखल, ११९ कोटी रुपयांच्या फसवणुकीप्रकरणी सीबीआयची कारवाई

निर्माता बंटी वालियाविरोधात गुन्हा दाखल, ११९ कोटी रुपयांच्या फसवणुकीप्रकरणी सीबीआयची कारवाई

googlenewsNext

प्रसिद्ध सिनेनिर्माता जसप्रीत वालिया उर्फ बंटी वालियावर (Bunty Walia) सीबीआयने(CBI) ने गुन्हा दाखल केला आहे. आयडीबीआय(IDBI) बॅकेची तब्बल 119 कोटी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी सीबीआयने ही कारवाई केली आहे.यासोबतच वालियाचे चार्ट्ड अकाऊंटंट स्टॅनी सलढाणा यांच्यावर देखील गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. बँकेने केलेल्या लेखी तक्रारीवरुन ही कारवाई करण्यात आली आहे.

संजय दत्त, बिपाशा बासू आणि कुणाल कपूर यांच्या 'लम्हा' या सिनेमाच्या निर्मितीसाठी वालिया यांच्या जी एस एन्टरटेन्मेंट आयडीबीआय बँकेकडून १० कोटी रुपये कर्ज घेतले होते. तर जून २००८ मध्ये ४.९५ कोटी रुपयांचे टर्म लोन घेतले होते. लम्हे सिनेमा २००९ मध्येच प्रदर्शित होणार होता पण प्रमोटर्स आणि प्रदर्शकांमधील वादामुळे प्रदर्शन लांबले. परिणामी ३० सप्टेंबर २००९ रोजी अकाऊंट नॉन परफॉर्मिंग म्हणून घोषित झाले. 

यानंतर बँकेने यावर तोडगा म्हणून सिनेमासाठी पीव्हीआरची वितरक म्हणून नियुक्ती केली. बँकेने जीएसईपीएल, पीव्हीआर आणि खासगी बँक यांच्यातील त्रिपक्षीय करारावर तोडगा काढत चित्रपट प्रदर्शित होण्यासाठी पीव्हीआरची वितरक म्हणून नियुक्ती केली. तसेच पीव्हीआरपोस्ट-प्रॉडक्शन कामासाठी ८ कोटी रुपये गुंतवेल असा करार झाला. 

बँकेचा आता आरोप आहे की पीव्हीआर कराराचे पालन करण्यात अपयशी ठरल्याने त्यांचे सुमारे ८३.८९ लाख रुपयांचे नुकसान झाले. कारण, कंपनीचे एकूण उत्पन्न केवळ ७.४१ कोटी रुपये होते, तरी कंपनीने जाहिरात आणि वितरणावर ८.२५ कोटी रुपये खर्च केले होते. कंपनीने खोटे कागदपत्र प्रमाणपत्र सादर केल्याचं फॉरेन्सिक ऑडिटमध्ये उघड झालं. त्यांनी बँकेचा निधी वळवला आणि अकाउंट बूक्समध्ये फेरफार केला, असे आरोपही बँकेने केले आहेत. या प्रकरणात बंटी वालिया, जीएसईपीएल आणि इतरांविरुद्ध  गुन्हेगारी, फसवणूक आणि भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: CBI registered case against producer Bunty Walia regarding bank fraud

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.