#CBIforSSR सत्य समजायलाच हवं, सुशांतची एक्स गर्लफ्रेंड अंकिता लोखंडेनेही मागितला न्याय
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 13, 2020 20:18 IST2020-08-13T20:18:31+5:302020-08-13T20:18:52+5:30
अंकिताने आपल्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ पोस्ट करत #CBIforSSR ची मागणी केली आहे.

#CBIforSSR सत्य समजायलाच हवं, सुशांतची एक्स गर्लफ्रेंड अंकिता लोखंडेनेही मागितला न्याय
बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंग राजपूत आत्महत्या प्रकरण सुरुवातीला मुंबई पोलिसांनी याचा तपास केला, मग सुशांतच्या कुटुंबाने बिहार पोलिसात एफआयआर दाखल केला आणि सीबीआयनेही आरोपपत्र दाखल केले आहे. ही केस सीबीआयकडे सोपवण्यात यावी अशी मागणी केली जाते आहे. सुरुवातीला अशी मागणी करणारी सुशांतची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्तीने मात्र सर्वोच्च न्यायालयात याचा विरोध केला आहे. मात्र सुशांतची एक्स गर्लफ्रेंड सुशांतला न्याय मिळवून देण्यासाठी त्याच्या कुटुंबाच्या पाठिशी खंबीरपणे उभी राहिली आहे.
अंकिता लोखंडेनेही अशी मागणी करणारा व्हिडीओ शेअर केला आहे. अंकिताने आपल्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ पोस्ट करत #CBIforSSR ची मागणी केली आहे. या व्हिडिओत अंकिता म्हणतेय की, सुशांतसोबत नेमकं काय झालं हे देशाला समजायलाच हवं. सुशांतला न्याय मिळवून देण्यासाठी अंकिता त्याच्या कुटुंबासह उभी राहिली आहे.
सुशांतची बहिण श्वेताने याआधी एक व्हिडिओ पोस्ट केला होता. ज्यामध्ये तिने आम्हाला सत्य जाणून घेण्याचा पूर्ण अधिकार असल्याचे म्हटले आहे.
या प्रकरणाची सीबीआय चौकशी व्हावी अशी सुशांतच्या कुटुंबीयांची इच्छा आहे. सुशांतच्या चाहत्यांकडून देखील वारंवार सीबीआय चौकशीची मागणी केली जात आहे. श्वेता सिंग किर्ती म्हणाली, मी तुम्हाला एक विनंती करते की पुन्हा एकदा एकत्र या आणि या केससाठी सर्वांनी एकजूट होऊन सीबीआय चौकशीची मागणी करावी. आम्हाला सत्यता जाणून घ्यायचे आहे आणि हे सत्य जाणून घेण्याचा आमचा हक्क आहे. जर असे नाही झाले तर आम्ही सत्यापर्यंत पोहोचू शकणार नाही. आम्ही शांतीपूर्ण जीवन जगू शकणार नाही.